अशी रंगणार ऑनलाईन नेमबाजी स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 June 2020
  • अव्वल आंतरराष्ट्रीय नेमबाजांचा सहभाग

मुंबई : आंतरराष्ट्रीय ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेच्या यशस्वी संयोजनानंतर आता सांघिक ऑनलाईन नेमबाजी लीग सुरू होणार आहे. एक महिना चालणाऱ्या या लीगमध्ये जगातील अव्वल आंतरराष्ट्रीय नेमबाजांचा सहभाग असेल.

ऑलिंपिक क्रीडा प्रकारासाठी पहिली ऑनलाईन लीग बहुधा घेण्याची संकल्पना आंतरराष्ट्रीय नेमबाज शिमॉन शरीफ यांनी मांडली आहे आणि त्यास चांगला प्रतिसादही लाभला आहे. दहा मीटर एअर पिस्तुल तसेच दहा मीटर एअर रायफल या दोन प्रकारांत झालेल्या ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेस चांगला प्रतिसाद लाभला होता. आता ही लीग हे त्याचे पुढचे पाऊल आहे.

ही लीग आंतरराष्ट्रीय आहे. लीगच्या स्वरूपानुसार त्यात भारतातील संघात परदेशी नेमबाज असण्याची शक्‍यता आहे; तसेच परदेशी संघातही भारतीय असू शकतात. ऑस्ट्रियाने आपला सहभाग निश्‍चित केला आहे. फ्रान्स तसेच इंग्लंडनेही तयारी दाखवली आहे, असे शरीफ यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी सुरुवातीस ही लीग जास्तीत जास्त आठ संघांचीच असेल. शनिवार आणि रविवार ही लीग होईल.

ऑनलाईन शूटिंग लीगचे स्वरूप

  • - लीग एकंदर आठ संघांची, त्यांची दोन गटांत विभागणी
  • - प्रत्येक संघात दोन एअर रायफल तसेच दोन एअर पिस्तुल प्रकारातील नेमबाज
  • - संघात थेट लढती होणार. प्रत्येक संघातील चार नेमबाजांचा एकाच वेळी लक्ष्यवेध
  • - प्रतिस्पर्धी संघातील ज्यांचे गुण जास्त त्यांना एक गुण मिळणार
  • - गुण समान झाल्यास पुन्हा लक्ष्यवेध
  • - पहिले दहा गुण मिळवणारा संघ लढतीचा विजेता
  • - गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News