मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा बदलणार ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 August 2020

मुलीचं लग्नाचं वय वाढवण्याचं एकमेव कारण म्हणजे मातृ मृत्यूदर भारतात कमी करायचा आहे. तसे काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा बदलणार ?

नवी दिल्ली - आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधन केले. त्यामध्ये अनेक मुद्द्यांवर मोदींनी चर्चा केली. परंतु लग्नासाठी मुलींचही वय आता १८ वरून वाढवून २१ केलं जाऊ शकतं असे संकेतही त्यांनी दिले. लग्नासाठी मुलीचं वय १८ वर्ष तर मुलांचं वय २१ वर्ष पूर्ण असणं आत्तापर्यंत बंधनकारक होतं. पण लग्नासाठी वयोमर्यादा काय असावी यावर भारत सरकार विचार करत आहे.
 

मुलींच्या लग्नाचं वय किती असावं यावर पुनर्विचार करण्यासाठी एक समिती तयार करण्यात आल्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. यावर समिती विचार करून एक अहवाल तयार करेल, त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुलीचं लग्नाचं वय वाढवण्याचं एकमेव कारण म्हणजे मातृ मृत्यूदर भारतात कमी करायचा आहे. तसे काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

अर्थसंकल्पीय भाषणात अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी  महिलेला आई बनण्याच्या योग्य वयाबद्दल सल्ला देण्यासाठी एक टास्क फोर्स बनवण्यात येईल असंही म्हटलं होतं. अर्थ मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर मोदींनी आज मुलींच्या विवाहाची मर्यादा वाढण्याचे संकेत दिले आहेत.

मुलींवर होणारे वैवाहिक अत्याचार रोखणं आवश्यक असल्याची गरज सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली होती. तसेच लग्नाचं किती असावं याचा निर्णय सुध्दा केंद्र सरकारने ठरवावा असंही सांगितले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News