विद्युतच्या "जंगली"चा विक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 5 August 2019
  • जंगली चित्रपटाला चीनमध्ये दोन पुरस्कार प्रदान
  • अभिनेता विद्युत जामवालाचे ‘फोर्स’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण

मुंबई : अभिनेता विद्युत जामवालाने ‘फोर्स’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो ‘कमांडो’, ‘कमांडो २’ सारख्या चित्रपटात झळकला. काही महिन्यांपूर्वी त्यांचा ‘जंगली’ चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट जंगलातील ॲक्‍शनवर आधारित आहे.

नुकताच या चित्रपटाला चीनमध्ये दोन पुरस्कार प्रदान करण्यात आले. चीनमधील ‘जॅकी चॅन इंटरनॅशनल फिल्म वीक’मध्ये ‘सर्वोकृष्ट ॲक्‍शन सिक्वेन्स चित्रपट कोरिओग्राफी’ आणि स्पेशल ज्युरी पुरस्कारासाठी ‘सर्वोकृष्ट ॲक्‍शन फॅमिली चित्रपट’ असे दोन पुरस्कार या चित्रपटाला देण्यात आले.

‘मला अशा देशात येऊन खरंच खूप आनंद झाला की ज्या देशात ॲक्‍शनला खरी ओळख मिळते.  मला अभिमान आहे, की याच देशात मला ॲक्‍शन पुरस्कार मिळाला आहे’, असे विद्युत सांगतो.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News