बायकोची किंमत चक्क ५० कोटी?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 4 January 2020
  • उत्तरप्रदेशातील मऊ येथे ही घटना घडली आहे.
  • नैराश्यातून त्याने चक्क दोन इंच रेल्वे रूळ कापला आहे.

लखनौ : लग्नानंतर पत्नीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून एका नवऱ्याने चक्क पत्नीची बोली लावली आहे. या नैराश्यातून त्याने माझ्या बायकोला न्या आणि ५० कोटी मिळवा, असा आशयाचे पत्र रेल्वे रूळ कापून त्याठिकाणी ठेवले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

उत्तरप्रदेशातील मऊ येथे ही घटना घडली आहे. नैराश्यातून त्याने चक्क दोन इंच रेल्वे रूळ कापला आहे. कापलेल्या रुळावर हे पत्र ठेवून त्याने माझ्या पत्नीला घेऊन जा आणि ५० कोटी मिळवा असं लिहिले आहे. याशिवाय माझी मागणी दोन दिवसांत पूर्ण न केल्यास यापेक्षा मोठे पाऊल उचलल्याचे धमकी त्याने दिली आहे.  

रेल्वेरुळाजवळून जाताना एका व्यक्तीला हा तुटलेला रूळ दिसला. त्यावेळी तातडीने त्याने रतनपुरा पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली आहे. त्यावेळी समोर एक ट्रेन येत होती, त्यापूर्वीच ही गोष्ट लक्षात आल्याने मोठा अनर्थ ठरला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News