यिनसारख्या युवकांचे संघटन करणाऱ्या चळवळीची आज का गरज आहे?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • राज्यात यिनने तरुणाईची मोठी चळवळ उभी केली, त्यामुळे यिनचे तरुण विविध क्षेत्रात आज उल्लेखनीय काम करत आहेत.

मुंबई : सकाळ माध्यम सुमहाच्या (YIN) यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कची सुरुवात २०१४ साली झाली. अल्पावधीत राज्यातील लाखो तरुणाई यिन सोबत जोडल्या गेली. तरुणाईला एकत्र करुन भविष्यातील सुशिक्षित पिढी घडवण्याचं काम यिन करत आहे. दरवर्षी राज्यातील महाविद्यालयीन निवडणूका घेणे, मंत्रीमंडळ स्थापन करणे आणि मंत्रीमंडाळाच्या माध्यमातून समाज उपयोगी काम उभ करण्याचा प्रयत्न यिनद्वारे केला जात आहे. यिनने राज्यात तरुणाईची मोठी चळवळ उभी केली, त्यामुळे यिनचे तरुण विविध क्षेत्रात आज उल्लेखनीय काम करत आहेत.  यिनसारख्या युवकांचे संघटन करणाऱ्या चळवळीची आज का गरज आहे? या विषयावर यिनबझच्या विविध व्हॅट्सअॅप ग्रुपवर चर्चा करण्यात आली. त्यातील विद्यार्थ्यांनी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया आम्ही देत आहोत.

चळवळ म्हंटली की प्रामुख्याने राजकीय चळवळ आणि सामाजिक चळवळ या दोन्ही चळवळीचा आपसूकच उल्लेख केला जातो .चळवळीची दिशा जर योग्य असेल तर नक्कीचं.त्या चळवळीला आणि चळवळीशी निगडित असलेल्या लोकांना त्याचा फायदा होतो.पण जर त्या चळवळीची दिशा भरकटली तर नुकसानच होतं.मोठ्या प्रमाणात तरुण हा चळवळीशी जोडला गेलेला असतो.एखादा सामाजिक तेढ जर निर्माण करायचा असेल तर एखाद्या चळवळीमध्ये ठिणगी टाकण्याचं कामं. केलं जातं.ज्याने तो विषय चिघळतो. बऱ्याचदा राजकीय पक्ष आणि काही सामाजिक संघटना .अश्या चळवळीचं माध्यम वापरून आपली सामाजिक व राजकीय पोळी भाजून घेण्याच काम करत असतात. इतिहासातील खूप साऱ्या चळवळी बद्दल तुम्ही ऐकलं किंवा वाचलं सुद्धा असेल.त्यातील कित्तेक चळवळी यशस्वी झाल्या.तर बऱ्याचश्या चळवळीची आणि त्यांच्याशी निंगडीत असलेल्या कुटुंबाची राख रांगोळी झाली. आजचा तरुण हुशार आहे आजचा तरुण तंत्रज्ञानाशी जोडला गेलेला आहे .आज काल चळवळ सुद्धा ऑनलाईन झाली आहे .म्हणजेच चळवळीची माध्यंम बदलू लागली आहेत.पूर्वी डफावर थाप आणि मुखी पोवाडा आहाहा ....ह्याने चळवळीत जीव ओतला जायचा मात्र आता तसं होताना दिसत नाही. आता सोशल मीडिया च्या माध्यमातून एखादी चळवळ उभी राहते. समाज्यात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट फिरत राहतात. आणि काही ते समजून न घेता त्याचा कुठलाही पाठपुरावा न करता कॉपी पेस्ट करत .इतरांना भरकटवण्याचा प्रयत्न करतात.ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता यिन सारख्या चळवळीची प्रामुख्याने आज गरज आहे . समाजकारण , अर्थकारण , विज्ञान ,कला, अश्या प्रत्येक घटकातील तरुण आज यिनशी जोडला गेला .फक्त राजकारणातच नव्हे तर .तर त्याला हव्या त्या क्षेत्रात आजचा तरुण कशी झेप घेऊ शकतो .त्याच्या पुढे किती संधी आहेत. तो कठीण काळात ही कसा उभा राहू शकतो हीच दिशा यिन तरुणांना दिली जाते . त्यामुळे यिन सारख्या असंख्य चळवळी आज उभ्या राहायला हव्या आहेत . ज्याने तरुणांचं भवितव्य नक्कीच उज्वल ठरेल .
 - संदिप सुखदेव पालवे .
 

प्रत्येक चळवळ शेवटी राजकीय टोकावर येवून थांबते... चळवळ सुरू केली तर ती अविरत चालू राहिली पाहिजे... नाहीतर एका क्षणासाठी मोठीं होवून पुन्हा त्याचा विचार होत नसेल तर काही उपयोग नाही... त्यापेक्षा यिन सभासद वाढवण्यावर भर दिला तर योग्य ठरेल. यिन ही संकल्पना प्रत्येक युवकाला माहिती होणे आधी गरजेचे आहे... यिन युवकांसाठी काय करते आणि काय करू शकते हे कळले पाहिजे. आज युवक वर्गात ताकद आहे. चुकीला चूक आणि योग्य का योग्य बोलण्याची... प्रत्येक अयोग्य गोष्टीवर दबाव टाकण्यासाठी युवक चळवळ पाहिजेचं...
- शंभूराज पाटील 
 
सकाळ माध्यम समूहाची यिन ही संकल्पना अत्यंत प्रेरणादायी आहे. जेव्हा आपण अशा संघटनेविषयी बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट युवकांना दिलेली ओळख. आज महाराष्ट्रात इतर संघटना आहेत परंतु, त्या संघटना पदाधिकाऱ्यांना त्यांची ओळख निर्माण करू देत नाहीत परंतु, यिन हे एकमेव व्यासपीठ आहे ज्यांनी युवकांना गावापासून दिल्लीपर्यंत ओळख करून देण्याचं काम केलं. सकारात्मक काम करण्याची ऊर्जा, नवीन काही करण्याची ताकद युवकांना दिली यिनने. विशेष म्हणजे या संघटनेत मोठ्या प्रमाणात युवतींचा सहभाग आहे, गाव खेड्यातल्या मुली सुद्धा काहीतरी सकारात्मक दृष्टिकोन घेऊन काम करताना दिसत आहेत. परंतु अशा संघटना निर्माण होणे ही काळाची गरज आहे, परंतु अशा संघटना निर्माण झाल्यानंतर त्याला राजकीय स्वरूप येणार यात तिळमात्र शंका नाही.  यंग इन्स्पिरेटक नेटवर्कची संघटन शक्ती वाढवून यांचा गौरव व्हावा, हीच आज सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पायर नेटवर्कच्या वर्धापनदिनी पदाधिकारी म्हणून इच्छा व्यक्त करतो 
- गणेश स्वामी 

युवकांच्या मनात काय आहे? हे चर्चाच्या माध्यमातून जाणून घेऊन त्यांना बातमीचे स्वरूप देणं व तमाम जनतेपर्यंत युवकांचे प्रश्न पोहचवण्याच काम आज यिन हे संघटन चळवळीच्या माध्यमातून करत आहे आपले प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आहे. अनेक युवक आपल्या समजासाठी काही करू पाहत असतात, त्यांच्यासाठी   सकाळ समूहाने उत्कृष्ट चळवळ चालू केली. त्याबद्दल मी सर्वात अगोदर धन्यवाद मानतो. तसेच यिनच्या सर्व पदाधिकारी यांना वर्धापन दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन.
- दिपक वाघ

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News