प्रेम विवाह न करण्याची शपथ फक्त तरुणींनीचं का घ्यावी?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 February 2020

सामुहिक शपथ प्रकरणाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु होती. माजी महिला व बालकल्याण मंत्री तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी टि्वट करुन सामुहिक शपथ प्रकरणावर भाष्य केले आणि महाविद्यालय प्रशासनाला चांगलाच समाचार घेतला.

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेस्टेशन जवळ असलेल्या महिला कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी व्हॅलेंटाईन डे निमित्त 'मी प्रेमविवाह करणार नाही' अशी सामुहिक शपथ घेतली होती. सामुहिक शपथ प्रकरणाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु होती. माजी महिला व बालकल्याण मंत्री तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी टि्वट करुन सामुहिक शपथ प्रकरणावर भाष्य केले आणि महाविद्यालय प्रशासनाला चांगलाच समाचार घेतला.  

ट्विटच्या माध्यमातून मुंडे म्हणाल्या, विद्यार्थिनींना प्रेम व प्रेमविवाह न करण्याची शपथ देणे हा विचित्र प्रकार घडला आहे. शपथ ही मुलींनीचं का घ्यावी? ती ही प्रेम व प्रेम विवाह न करण्याची, मुलांनीही शपथ घ्यावी, मी कोणत्याही मुलीवर अन्याय, अत्याचार करणार नाही, एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही, कोणावरही अॅसीड हल्ला करणार नाही, जिवंत जाळणार नाही, वाकड्या नजरेने पाहणार नाही, कोणी असे दुष्यकृत्य करत असेल तर ते थांबवण्यासाठी मी प्रयत्न करेल. अशी शपथ विद्यार्थ्यांनी घ्यावी' असा मोलाचा सल्ला व्हॅलेंटाईन डे निमित्त पंकजाताईने तरुणाईला दिला.  

 
सामुहिक शपथ प्रकरणा याविषयी पत्रकारांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना प्रश्न विचार? त्यावेळी ठाकरे म्हणाले, 'लग्न हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. कोणी कुणासोबत लग्न कराव आणि कोणत्या पद्धतीने कराव हा ज्याचा त्याचा अधिकार आहे मात्र, इतरांनी सल्ले देऊ नयेत आणि कुणावर बळजबरी करु नयेत' अशी प्रतिक्रीया ठाकरेंनी दिली होती.

प्रेमी युगलांसाठी फेब्रुवारी महिना विशेष असतो, खास करुन 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेन्टाईन डे (प्रेमाचा दिवस) म्हणून जगभर साजरा केला जातो. जगभरातील प्रेमी युगल वर्षभर 'व्हॅलेन्टाईन डे' ची आतुरतेने वाट पाहतात. 'व्हॅलेंटाईन डे' आधी 'व्हॅलेंटाईन आठवडा' (Valentine Week) सुरु होतो. संपुर्ण आठवडाभर वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. सात दिवस आपल्या प्रियजनाना वेगवेगळे गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त केल जाते. 'व्हॅलेन्टाईन डे आठवड्यातची सुरुवात 7 जानेवारीला होते आणि 14 जानेवारी पर्यंत चालतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News