महाराजांनी स्वराज्याचा राजधानीसाठी रायगडाचीच निवड का केली? वाचा हे ज्वलंत उत्तर...

विश्वजीत जगताप
Thursday, 9 May 2019

लष्करीदृष्ट्या रायगडाला विशेष असे महत्व आहे. रायगड अशा ठिकाणी जेथे शत्रूला सहजासहजी पोहोचणे दुरापास्त आहे.

लष्करीदृष्ट्या रायगडाला विशेष असे महत्व आहे. रायगड अशा ठिकाणी जेथे शत्रूला सहजासहजी पोहोचणे दुरापास्त आहे. रायगडाच्या सभोवती जवळपास ६० ते ६५ किल्ल्यांचे असे संरक्षण आहे व केंद्रस्थानी रायगड आहे. काही किल्ले रायगडावरून सहज दिसतात. रायगडाची उंची सुद्धा असाधारण आहे. सुमारे ४००० फूट उंच.

रायगडाचा जवळपासचा एखादा किल्ला शत्रूच्या ताब्यात गेला आणि तेथून रायगडावर तोफांचा मारा केला तर तो रायगडाच्या तटबंदीपर्यंत पोहोचणारच नाही अशी नैसर्गिक परिस्थिती आहे. आणखी एक वैशिष्ट्य असे की रायगडाच्या बालेकिल्ल्यावरून अतिशय सुलभरीत्या किंवा प्रकाशाच्या माध्यमातून संदेशवहन केले जाऊ शकते.

शिवाय रायगडाला असलेले कडे काळ्याकभिन्न खडकाचे व ताशीव असे आहेत आणि गडाच्या चारही बाजूने किर्रर्र अशी काटेरी झाडी असल्यामुळे शत्रूला कड्यावरून गडावर चढणे अशक्य बाब होती. रायगडाची सुरक्षितता अबाधित राहावी म्हणून महाराजांनी ईशान्येला लिंगाणा, पूर्वेला तोरणा-राजगड, दक्षिणेला कांगोरा,चांभारगड,सोनगड, वायव्येला तळेगड तर उत्तरेला घोसाळगड अश्या किल्ल्यांचा मध्यभागी रायगड हि स्वराज्याची राजधानी निवडली. शिवाय इथून कोकणातील भूप्रदेश जवळ आहे. आरमाराची राजधानी असलेला सिंधुदुर्ग हा जलद संपर्काच्या टप्प्यात आहे .

अशा सर्व दृष्टीने अनुकूल असलेल्या रायगड किल्ल्याची राजधानीसाठी महाराजांनी केलेली निवड अतुलनीय आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News