शिक्षणाचे खाजगीकरण का वाढत आहे?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • शासगी शिक्षण संस्था आर्थिक दृष्या प्रतिकुल असणाऱ्या विद्यार्थ्यांना परवडणारी नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

मुंबई : केजी टू पीजी खासगी शिक्षण संस्थामधून शिक्षण घेणे सर्व सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे झाले, दिवसेंदिवस शिक्षण हे महाग होत चालले आहे. शिक्षणाचे खासगीकरण वाढत आहे. शासगी शिक्षण संस्था आर्थिक दृष्या प्रतिकुल असणाऱ्या विद्यार्थ्यांना परवडणारी नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. 'शिक्षणाचे खाजगीकरण का वाढत आहे?' या विषयावर यिनबझच्या विविध व्हॅट्सअॅप ग्रुपवर चर्चा करण्यात आली. त्यातील विद्यार्थ्यांनी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया आम्ही देत आहोत.

ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा मानवाची मूलभूत गरज आहे. त्याचप्रमाणे शिक्षण हा मुख्य घटक आहे. शिक्षणाशिवाय मानवाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. पण आजकाल विद्यार्थ्यांना योग्य  व दर्जेदार शिक्षण मिळत नाही. सगळीकडे शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. मराठी शाळा ओस पडल्या आहेत. मुलांना ट्युशन लावणे, शाळेची फी, दप्तर यातच पालकाची दमच्याट होते. ज्या शाळेची पटसंख्या कमी आहेत, अश्या सरकारी शाळा सरकारने बंद केल्या. शिक्षणक्षेत्रात खाजगी कंपन्यांना प्रवेश देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्वयंअर्थसहायित शाळा, सुधारणा विधेयक विधासनसभेत मांडण्यात आले  व मंजूर करण्यात आले. यामुळे रिलायन्स, बिर्ला सारख्या कंपन्यांना राज्यात कुठेही शाळा चालू करण्यास दारे मोकळी झाली आहे. शिक्षणाचं क्षेत्र वाढलं पण सुशिक्षित बेरोजगाराची संख्या तेवढीच वाढली.
- कृष्णा गाडेकर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News