२१ व्या शतकात देखील आंतरजातीय विवाहाला विरोध का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • आता २१ व्या शतकात देखील समाजात आंतरजातीय विवाहाला विरोध केला जातो.
  • परंतु हे कितपत योग्य आहे, आपण म्हणतो की, आम्ही जात-पात असा भेद-भाव करत नाही मग लग्न करताना का? जात-पात पाहिले जाते.

मुंबई :- आता २१ व्या शतकात देखील समाजात आंतरजातीय विवाहाला विरोध केला जातो. परंतु हे कितपत योग्य आहे, आपण म्हणतो की, आम्ही जात-पात असा भेद-भाव करत नाही मग लग्न करताना का? जात-पात पाहिले जाते. मग त्यात मुलीचे सुखाचा देखील विचार केला जात नाही. फक्त समाजात लोक काय म्हणतील म्हणून आंतरजातीय विवाहाला विरोध केला जातो. २१व्या शतकात असून देखील आंतरजातीय विवाहाला विरोध का? याच विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपवर मनोसत्त्क चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.  

आज एक संवेदनशील विषय म्हणुन आंतरजातीय विवाहाकडे पाहिले जात आहे. आपण घडविलेल्या या समाजातील रितीरिवाज आणी परंपरा या आपणच निर्माण केलेल्या असतात. मात्र त्या तोडण्याच स्वातंत्र्य मात्र कुणालाच नसत. मात्र मुलगा-मुलगी नविनच कॉलेज मध्ये जातात तेव्हा ते पाहिले एक मित्र मैत्रीण असतात पण नंतर त्या दोघांचं मैत्रीच रूपांतर प्रेमामध्ये होत आणि ते दोघे ४- ५ वर्ष एकमेकांवर खुप प्रेम करतात. पण त्यांच्या मध्ये जात मध्ये येत आणि ती मुलगी आपल्या जातीला महत्व देते आणि तिथे दोघांचं प्रेम सम्पत आणि मुलगी एका सरकारी जॉब असलेल्या मुला बरोबर लग्न करते पण त्या मुलाबरोबर लग्न करून सुद्धा ती खुश नसते खरच जे शिकललेले असलेले सुद्धा आज काल आपल्या जाती मुळे जर असे होते तर हे चुकीचं आहे.

एखाद्या मुलाने किंवा मुलीने आंतरजातीय विवाह केलाच तर त्याला हसणाऱ्याची संख्याही कमी नसते. मात्र काळाच्या ओघात त्यांची संख्याही वाहुन जाते आणी त्यांच हास्यही ओसरुन जात. तरी आजही आंतर जातीय विवाहाला मान्यता नाही. एखाद्या मुलीने जर का आंतरजातीय विवाह केलाच तर ती घरच्यांसाठी तर मरतेच शिवाय ज्या घरी ती लग्न करुन जाते त्या घरातील छळवादालाही तिलाच सामोरे जावे लागते. आंतरजातीय विवाह ही आता काळाची गरज आहे. जात, पात आणी धर्म यांचा बागुलबूवा करुन समाजाने तरी काय मिळवले आहे.  आयुष्यभर ज्याच्या बरोबर जिवन व्यतीत करावयाचे तो जोडिदार चांगला मिळाला म्हणजे झाले. आपल्या पेक्षा खालच्या जातीत विवाह करणं म्हणजे पापच असत हे समाजातील उच्चभ्रुंनी समाजावर लादलेलं त्यांच स्वतःच वैयक्तिक मत असत.

आपल्याला समाजाची गरज असते पण एखाद्याच्या संसारात लुडबुड करण्याइतकी त्याची मजल गेली की, संसाराची राखरांगेळी झालीच म्हणुन समजा. सध्याची परिस्तिथी पहाता समाजातील कुठल्याही अटी बंधन न पाळणारी एक पिढीउदयास येत असल्याचे आपल्याला पहायला मिळेल. मात्र याच ठिकाणी अशी ही पिढी आहे जे आजही आपल्यावर लादलेल्या अन्यायाला निमुटपणे स्विकारतात. कुणी आपले प्रेम मिळवण्यासाठी कोर्ट मॅरेज करुन मोकळे होतात. तर कुणी आपल्या घरच्यांचा विरोध मोडता येत नाही म्हणून आपल्या घरच्यांच्या मर्जिनुसार अरेंज मॅरेज करुन मोकळे होतात. समझोता करावा पण जिथे आपल्या भावी आयुष्याचा प्रश्न निर्माण होतो तिथे समझोता करणे म्हणजे आत्महत्याच होय. जाती धर्मावरुन कधीच कुठल्या व्यक्तिची पारख होत नाही. तिची पारख होते ते तिच्या कर्तृत्वावरुन आणि गुणांवरुन. एकमेकाला अनुरुप, चांगल्या क्षेत्रात चांगल्या हुद्दयावर काम करत असताना त्यांच्यात जात धर्माचा अडथळा आणुन त्यांनी निवडलेल्या जोडीदाराला चुकीच ठरवण कितपत योग्य आहे. समाजालाही ते कळत पण वळत नाही. एखाद्या चुकिच्या निर्णयामुळे एखाद्याच आयुष्य तर उध्वस्त होत नाही ना, याचा विचार होणेही आवश्यक आहे. आज देशात कमी होत असलेले मुलींचे प्रमाण, त्यात शिक्षणातील मुलांचे कमी प्रमाण अशावेळी धर्मातील मुलगा किंवा मुलगी मिळणे जवळ जवळ अशक्य आहे. तर मग आंतरजातीय विवाहाला समाज मान्यता मिळायला काय हरकत आहे. यात वावगे काहीच नसल्याचे आपल्या लक्षत येईल पण त्यासाठी आवश्यक आहे तो सकारात्मक दृष्टिकोन...

महेश सोरटे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News