ऑनलाईन शिक्षणासाठी सरकारकडून शासकीय वाहिन्यांचा वापर का नाही?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 7 July 2020

कोरोनाचे संकट वाढत असल्याने शाळा महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. परंतु असे असले तरी देखील कोरोनाच्या संकटामुळे  मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता राज्य सरकारने शाळा तसेच महाविद्यालयांना ऑनलाईन वर्ग भरविण्याच्या सूचना दिल्या.

मुंबई :- कोरोनाचे संकट वाढत असल्याने शाळा महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. परंतु असे असले तरी देखील कोरोनाच्या संकटामुळे  मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता राज्य सरकारने शाळा तसेच महाविद्यालयांना ऑनलाईन वर्ग भरविण्याच्या सूचना दिल्या. अनेक खाजगी शाळा विविध अँपस च्या माध्यमातून ऑनलाईन वर्ग भरवू लागले आहेत परंतु महानगरपालिका, तसेच ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यास अनेक बाधा निर्माण होत आहेत.
 
राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून नुकतेच रिलायन्स जिओ अँपच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाकरिता तीन शैक्षणिक वाहिन्या सुरु करण्यात आल्या आहेत. दहावी मराठी तसेच इंग्रजी माध्यम आणि बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी जिओ टीव्हीवर "ज्ञानगंगा" आणि जिओ  सावनवर  "महावाणी रेडिओ" या कार्यक्रमांचे उदघाटन शिक्षणमंत्रांच्या हस्ते करण्यात आले. परंतु ऑनलाईन शिक्षणासाठी रिलायन्स जिओ सारख्या खाजगी वाहिन्यांचा वापरकरण्यापेक्षा सह्याद्री आणि बीएसएनएल सारख्या शासकीय वाहिन्यांचा वापर का केला जात नाही? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था ही एका खाजगी कंपनी कडून करणाऱ्या राज्यातील शिक्षण विभागाकडे विरोधकांनी या संदर्भात विचारणा केली आहे.  तसेच या निमित्ताने राज्याच्या स्वतःच्या शिक्षण वाहिनीचे काय झाले?, दूरदर्शन, प्रसारभारतीकडे मुलांच्या शिक्षणाकरिता मागण्यात आलेली वेळ मिळाली नाही का असे अनेक सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्यातील शिक्षण विभागाला विचारले आहेत. केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दूरदर्शन वाहिन्यांच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम सुरु करीत आहेत मग राज्य सरकार सह्याद्री चॅनेल च्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम का सुरु करू शकले नाहीत त्यांना खाजगी वाहिन्यांचीच मदत का घ्यावी लागते असे प्रश्न अतुल भातखळकर यांनी विचारले. महाविकास आघाडीच्या सरकारने  खाजगी कंपन्यांची तिजोरी भरण्याचा विडा उचलला आहे अशी टीका देखील यावेळी विरोधकांकडून करण्यात आली. तसेच खाजगी वाहिन्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास राज्य सरकारला इतकाच रस असेल तर सरकारनेच ऑनलाईन शिक्षणाकरिता लागणाऱ्या डेटा पॅक चा खर्च करावा अशी मागणी विरोधकांनी सरकारकडे केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News