घेऊ का पोटापुरतं...?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019

पंगतीत बसलेत दगडाचे देव रे..
दगडाच्या देवाला खाऊ जरा ठेव रे.

बसल्याजागी मिळतं तूला नैवेद्द तुपाशी
माणसांच्या बाजारात मी मात्र उपाशी...

तोंड तुझं दिसत नाही खाणार तू कसा
खाणार नसशील तू तर मीघेऊ का  जरासा ?

तू देव नाहीस असं म्हणता येणार नाही
उष्ठ तुझं नेतो खुश होईल माझी ताई...

मागत नाहीस, रडत नाहीस तरी देतात तुला.
भिका-याचं पोर म्हणून चिडवतात मला.

पंगतीत बसलेत दगडाचे देव रे..
दगडाच्या देवाला खाऊ जरा ठेव रे.

बसल्याजागी मिळतं तूला नैवेद्द तुपाशी
माणसांच्या बाजारात मी मात्र उपाशी...

तोंड तुझं दिसत नाही खाणार तू कसा
खाणार नसशील तू तर मीघेऊ का  जरासा ?

तू देव नाहीस असं म्हणता येणार नाही
उष्ठ तुझं नेतो खुश होईल माझी ताई...

मागत नाहीस, रडत नाहीस तरी देतात तुला.
भिका-याचं पोर म्हणून चिडवतात मला.

दगडाचा असला तरी राग येत नाही तुला
पुढयातलं खायाला  सारं देतोस का मला...

तुला जे कळतं ते माणसाला कळत नाही
माणसांतल्या माणसाला माणुसकी मिळत नाही..

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News