जपानमध्ये सिनेमागृह कायमचं बंद होताना का दाखवला '3 इडियट्स'?

यिनबझ टीम
Wednesday, 4 March 2020

'3 इडियट्स' हा सिनेमा 25 डिसेंबर 2009 साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अद्यापही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. 

राजकुमार हिरानी यांनी निर्मित केलेला '3 इडियट्स' हा चित्रपट 2009-10 साली सर्वोत्तम चित्रपट म्हणून प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा सर्वोत्तम कमाई करणारा चित्रपट म्हणूनदेखील घोषित करण्यात आला होता. त्यावेळी हा सिनेमा 415 विदेशी चित्रपटगृह आणि 1800 भारतीय सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. 

या सिनेमाला आतापर्यंत जास्त काळ झाला असला, तरी मात्र या सिनेमाची क्रेझ काही कमी झाली नसल्याचे पाहायला मिळते, त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे जपानमध्ये बंद झालेले एक चित्रपटगृह होय.

जपानमधल्या ओसोका या शहरातील एक चित्रपटगृह त्याचा कालावधी संपल्याने बंद होत आहे. हे चित्रपटगृह बंद करताना मात्र त्याच्या मालकाने या चित्रपटगृहातला शेवटचा सिनेमा म्हणून '3 इडियट्स' हा भारतीय चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर मात्र लगेचच हे सिनेमागृह एकदम हाऊसफुल्ल झालं. 

सिनेमा गृहाच्या आयोजकाने लगेचच ट्विट करत संबंधीत चित्रपटाविषयी माहिती दिली. हा शो भारतीय वेळेनुसार  15.30 मिनिटांनी प्रदर्शित होत आहे. या सिनेमाला 131 प्रेषकांची सोय होती, मात्र त्याहून अधीक एंट्री झाल्यामुळे आम्ही या शोची एंट्री बंद करत आहोत. या आधी अनेक भारतीयांनी आपल्या चित्रपटगृहामध्ये '3 इडियट्स' हा सिनेमा दाखवावा म्हणून चित्रपटगृहाच्या मालकाकडे विनंती केली होती, अखेर त्या विनंतीला मान देऊन चित्रपटगृहाच्या मालकाने हा निर्णय गेतल्याचे समजते आहे. 

'3 इडियट्स' हा सिनेमा 25 डिसेंबर 2009 साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अद्यापही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News