आंतरजातीय विवाहाला विरोध का केला जातो? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 August 2020
  • आमची चर्चा, माझ मत...
  • समाजाचे रक्षक समजणारे राक्षसाचा अवतार घेतात आणि अंतरजातीय विवाह केला म्हणून द्वेश पसरवतात.

मुंबई : शिक्षणामुळे समाज सुशिक्षित झाला, तरी देखील आधुनिक काळात आंतरजातीय विवाहाला विरोध केला जातो. आंतरजातीय विवाह केला म्हणून प्रेमी युगलांना त्रास दिला जातो. मारहान केली जातो, काही वेळा प्रेमी युगलांचा जीव घेतला जातो. समाजाचे रक्षक समजणारे राक्षसाचा अवतार घेतात आणि अंतरजातीय विवाह केला म्हणून द्वेश पसरवतात. या संपुर्ण प्रकरणाकडे तरुणाई कशी पाहते या संदर्भात 'यिनबझ'ने तरुणाई व्यक्त होण्यासाठी एक प्रश्न विचारला होता. आंतरजातीय विवाहाला विरोध का केला जातो? तुम्ही आंतरजातीय विवाहाकडे कसे पाहता?' याविषयी तरुणाईने आज मनसोक्त चर्चा केली. तरुणाईने व्यक्त केलेल्या काही निवडक प्रतिक्रीया आम्ही देत आहोत.

आपला कालचा विषय होता जातीवाद, आणि आंतरजातीय विवाहाला विरोध फक्त जाती मुळेच येतोय. माझ्या मते आंतरजातीय विवाहानंतर जातीवाद कमी होण्याची शक्यता आहे. समाजात पसरलेल्या विषमते मुळे काही प्रेमी युगलांचे स्वप्न तुटले आहे. आंतरजातीय विवाहाला समाजाने संमती दिली तर मुली घरून पळून जाण्याचे किंवा आत्महत्येचे प्रमाण नाहीसे होईल.गरज आहे ती आंतरजातीय विवाहाला समाजाने दुसऱ्या नजरेने पाहण्याची. माझ्या मते आंतरजातीय विवाह योग्य आहे
- अजय डुमनवाड

जात आणि आंतरजात ह्या एकाच नान्याच्या दोन बाजू आहेत. जाती व्यवस्थेमुळे आंतरजातीय विवाह करण्यात अनेक अडचणी येतात. महानगरात अंतरजातीय विवाहाला कोणी विरोध करत नाही. हाच आंतरजातीय विवाह ग्रामीण भागात केला तर प्रेमी युगलाला ठार मारले जाते. काही धर्मवेड्या लोकांमुळे आंतरजातीय विवाहाला विरोध होतो. जो पर्यंत जाती व्यवस्था नष्ट होणार नाही तोपर्यंत आंतरजातीय विवाहाला विरोध राहील. त्यासाठी जनतेची माणसीकता बदलने गरजेचे आहे.
- कृष्णा गाडेकर

पहिली गोष्ट म्हणजे जातच नसेल तर आंतरजातीय विवाह हा विषय येणारच नाही. तरीपण त्याविषयी सांगायचे झाले तर आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले पाहिजे ,त्याचा स्वीकार केला पाहिजे ...विरोध सर्वात जास्त ग्रामीण भागातून केला जातो याचे कारण म्हणजे निरक्षरता आणि वाटणारा गैरसमज की लोक काय म्हणतील,आपल्या ईज्जतीच काय होईल ,लोक आपल्याशी बोलणार नाहीत ,वाळीत टाकतील या विचाराने लोक जात, धर्म या अनिष्ट रूढी ला जवळ करतात.....विचार करण्यासारखी गोष्ट आहे जात आणि धर्माचा सर्वात जास्त फायदा पक्ष आणि नेते स्वार्थासाठी घेतात आणि तेच  सरकारमार्फत पुन्हा कायद्याद्वारे धर्मनिरपेक्षता , सर्वधर्मसमभाव, अशी खोटी आश्वासन देतात जी फक्त कायद्यापुरतीच मर्यादित असतात , आपल्या रोजच्या जीवनात त्यावर पूर्णपणे अंकुश आहे तो फक्त आपल्या विचारांमुळे ....मी काल पण सांगितले होते जात ही आपणच बनवलेली  आहे आणि नष्ट पण आपणच करणार आहोत , ज्यामध्ये आपल्याला कुठलाही अडथळा येऊ शकत नाही फक्त प्रत्येकाने एक काम करायचे आपल्या मुलांना आपलं सर्व काही द्यायचं पैसा,जमीन ,मालमत्ता .. फक्त एक गोष्ट द्याची नाही ती म्हणजे जात आणि धर्म , टीसी वरूनच नष्ट करत गेलो तर एक दिवस नक्की असा येईल की जात नसेल.. हा एकच पर्याय आहे असे मला वाटते ..सरकारला विनवणी करून हे होणार नाही कारण सरकार याचाच वापर करून  बनलेले आहे...असे झाले तरच आंतरजातीय विवाह पण हा विषयच राहणार नाही ...आणि ही गोष्ट आपल्यापासून सुरुवात करा आणि या विषयांवर फक्त चर्चा करण्यापेक्षा या अनिष्ट गोष्टी नष्ट कण्यासाठीच प्रयत्न करा... सर्वजण तयार आहात का आपली व आपल्या पुढच्या पिढीची  जात व धर्म सोडून द्यायला ?? 
- जग्गनाथ उगले

आंतरजातीय विवाहाला विरोध हा लोकांच्या निरक्षरते मुळे आणि वैचारिक मागासलेपणा मुळे आहे. लोकांनी आंतरजातीय विवाहाला प्रतिष्ठेशी जोडले. आंतरजातीय विवाह केल्याने आपली इज्जत कमी होईल असं लोक विचार करतात. आणि आंतरजातीय विवाह हा समाजाणे गुन्हा बनविला आहे. आपण समाजात राहतो. समाजाची बंधने मानावी लागतात. त्यामुळे समाज हा एक कारणीभूत घटक आहे. बहुतेक आंतरजातीय विवाह प्रेम विवाह असतात त्यामुळे सुद्धा विरोध होत असेल. माझ्या मते आंतरजातीय विवाहाला समाजाने मान्यता द्यायला हवी. समजातील भेदभाव जातीव्यवस्था नष्ट करण्याच ते एक उत्तम उपाय आहे.
- प्रतिक भालेराव

मी इंटरकास्ट विवाहांना समर्थन देत नाही! आपण जातीची ओळख करून द्यायची इच्छा का आहे? लोक आंतरजातीय विवाहांना काल्पनिक समजतात आणि काहींना त्रास का आहे हे मला समजत नाही. या म्हणी प्रमाणे "सबसे बड़ा रोग, क्या कहेंगे लोग!" इंटरकास्ट विवाह समाजात समानतेला चालना देतात. ही संकल्पना स्पष्टपणे समजून घेण्यासाठी लोकांना स्वत:ला शिक्षित करणे आवश्यक आहे. जीवशास्त्रीयदृष्ट्या, जर संतती अनेक पिढ्या एकाच कुटुंबात संकरित केली गेली तर संतती कमजोर होईल. हेच कारण आहे की आपल्याकडे एकाच कुटुंबात विवाह होत नाहीत. म्हणूनच आंतरजातीय विवाह एकाच वेळी अधिक संतती आणि सामाजिक सुरक्षिततेस प्रोत्साहित करतात.
-सर्वेश बागडे 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News