जोफ्राच्या पासपोर्टची यांना का घाई? थेट मैदानातून हाकलवून लावलं...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 September 2019

जोफ्रा आर्चरला उद्देशून टोमणा मारल्याबद्दल दोन ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांची ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममधून हकालपट्टी करण्यात आली. हा प्रकार पहिल्यादिवशी घडल्याचे वृत्त स्थानिक दैनिकांनी दिले. "जोफ्रा, आम्हाला तुझा पासपोर्ट दाखव' अशा शब्दांत त्याला हिणविण्यात आले. 

जोफ्रा आर्चरला उद्देशून टोमणा मारल्याबद्दल दोन ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांची ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममधून हकालपट्टी करण्यात आली. हा प्रकार पहिल्यादिवशी घडल्याचे वृत्त स्थानिक दैनिकांनी दिले. "जोफ्रा, आम्हाला तुझा पासपोर्ट दाखव' अशा शब्दांत त्याला हिणविण्यात आले. 

मॅंचेस्टर :  जोफ्रा आर्चरला उद्देशून टोमणा मारल्याबद्दल दोन ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांची ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममधून हकालपट्टी करण्यात आली. हा प्रकार पहिल्यादिवशी घडल्याचे वृत्त स्थानिक दैनिकांनी दिले. "जोफ्रा, आम्हाला तुझा पासपोर्ट दाखव' अशा शब्दांत त्याला हिणविण्यात आले. 

ईशान म्हणाला, याचा जीव केवढा, मारून-मारून किती लांब मारेल!
जोफ्राचा जन्म बार्बाडोसमध्ये झाला आहे. त्याला इंग्लंडकडून लवकर खेळता यावे म्हणून इंग्लिश क्रिकेट मंडळाने नियम शिथिल केले होते. संबंधित प्रेक्षक इंग्लंड संघाच्या ड्रेसिंग रूमच्या खालील आसनांवर बसले होते. आर्चर सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करीत असताना त्यांनी अशी वर्णभेदी ठरू शकणारी "पृच्छा' केली. त्यावेळी आर्चर संतापल्याचे दिसून आले, पण त्याने प्रत्युत्तर दिले नाही. एका दैनिकातील वृत्तानुसार जोफ्रा दोन वर्षांचा असल्यापासून येथे येतो आहे. तो काही येथे अचानक उपस्थित झालेला नाही, तशा आशयाच्या वक्तव्याकडे तुम्ही दुर्लक्ष करायला हवे.' 

लॅंकेशायर कौंटी क्‍लबच्या प्रवक्‍त्याने सांगितले की, शिवीगाळ करणाऱ्या प्रेक्षकांचे वर्तन अजिबात खपवून घ्यायचे नाही धोरण आता अवलंबिण्यात आले आहे. त्यामुळे तातडीने कारवाई झाली. यापूर्वी लॉर्डस मैदानावर स्टीव स्मिथची हुर्यो उडवून अपशब्द वापरल्याबद्दल मेरीलीबोन क्रिकेट क्‍लबने एका सदस्याची हकालपट्टी केली होती. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News