मीडिया हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, समाजाचा आरसा म्हणून मीडियाकडे पाहिले जाते, देशातील गंभीर समस्या मांडण्याचे काम मीडियाने कालपर्यंत केले, अनेक वेळा सरकारला जाब विचारला, वेळ प्रसंगी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. त्यामुळे मीडियावरचा विश्वास बाढत होता. सध्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाने व्यावसायिक रूप धारण केले आहे. पैसे मिळवण्यासाठी मीडियाने वाटेल ते करण्याची तयारी दर्शवली, त्यामुळे समाजातील गंभीर प्रश्न बाजूला राहिले. चटक, मटक, सटक अशा प्रश्नावर मीडिया चर्चा करताना दिसते. काही दिवसापूर्वी सरकारने मीडिया वरची बंधने अधिक कठोर केली, त्यामुळे मीडिया सरकारच्या हातचे बाहुले बनले आहे का? असा प्रश्न तरुणाईने उपस्थित केला.
काय वाटतयं तरुणाईला?
औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचा विद्यार्थी कृष्णा गाडेकर म्हणाला की, सोशल मीडिया हे जनतेचा आवाज आहे, असे ओरडून सांगीतसे जाचे. पण हे चुकीचे आहे. सध्याचा विचार केला तर बेरोजगारी, आरोग्य व्यवस्था, शैक्षणिक गोंधळ, घसरत चाललेली अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार अशा विविध समस्या आहेत. यावर कधी मीडिया खुलून बोलताना दिसत नाही. समाजिक समस्यांना मीडियाने वाचा फोडली पाहिजे मात्र प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही. गरिबीचे प्रमाण आजही जास्त आहे यावर मीडिया बोलत नाही. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकरी रोज आत्महत्या करतो यावर मीडिया बोलत नाही. समाजात रोज कितीतरी गरीब लोक उपासमारीने, बेरोजगारीमुळे, अपघाताने, बिमारीमुळे मरत आहेत. हे कधीही टीव्हीवर दाखवल्या जात नाही. सेलेब्रिटी, राजकारणी यांच्याच बातम्या मिर्चमसाला लावून दररोज दाखवल्या जातात. जर चुकून एखाद्या मीडियाने प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आवाज राजकारण्यांकडून दाबला जातो.
कोणते आहेत देशातील गंभीर प्रश्न?
भारत हा जगातील सर्वांधिक तरुण देश आहे. भारतीय तरुणांची श्रमशक्ती इतर देशाच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे कमागारांचा खजिना म्हणून भारताकडे पाहिली जाते, तरी देखील देशात बेरोजगारीचे प्रमाण भयंकर आहे, दिवसेंदिवस बेरोजगारी बाढत आहे, मात्र सरकार बेरोजगारीवर ठेस उपाय योजना करता दिसत नाही, बेरोजगारीसारखा गंभीर प्रश्नावर मीडिया चर्चा करत नाही, सरकारने घेतलेल्या चुकीच्या धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था रसातळाल गेली आहे, उत्पन्नाचे स्त्रेत आटले, त्यामुळे सरकारी उद्योग- व्यवसाय खासजी कंपन्यांना विकून वित्त निर्मिती करत आहे, त्यामुळे भांडवलशाही लोकशाहीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे तरी देखील मीडिया गप्प आहे. सर्व शासकीय आरोग्य यंत्रना कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आहोरात्र काम करत आहे, मात्र सामन्य आजार असलेल्या रुग्णांना उपचार वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे त्यांचा मृत्यू होत आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यू पैक्षा अधिक सामन्य आजाराने रुग्ण दगावले आहेत, मात्र त्यांची दखल मीडियाने घेतली नाही, मूलभूत समस्यांवर मीडिया प्रकाश टाकताना दिसत नाही.
टीआरपीच्या नादात समस्यांकडे दुर्लक्ष
इंटरनेटच्या सार्वत्रिक वापरामुळे सोशल मीडिया हा नवा प्रकार उदयास आला. काही मिनिटात सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी माहिती विनामुल्य जगभर पोहचू लागली, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया यांच्यात कमालीची जीवघेणी स्पर्धा सुरु झाली. 'सर्वात पहिली बातमी'च्या नावाखली सत्यता न पडताळता ती प्रसारित होईल लागली. ज्या बातमीला टीआरपी अधिक आहे ती बातमी दिवस रात्र, महिने, प्रसारिक करु लागली. त्यामुळे टीआरपीच्या नादात मीडियाने देशातील समस्यांकडे दुर्लक्ष केले.