अभियांत्रिकी क्षेत्रात बेरोजगारी का वाढते? 

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा- यिनबझ)
Wednesday, 16 September 2020

अभियांत्रिकीची पदवी घेऊन लाखो तरुण सध्या बेरोजागर आहेत. त्यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न  केला. त्यातून अनेक प्रतिक्रीया मिळाल्या. शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यामध्ये असलेल्या कमतरता अभियंत्यांनी प्रमाणिकपणे सांगितल्या. तर काहींनी शासनावर खापर फोडले.

मुंबई : भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांचा जन्म दिवस संपुर्ण देशात 'इंजीनियर्स डे' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांची चर्चा केली. त्यातून अभियात्रिकी क्षेत्रात दिवसेंदिवस बेरोजारी वाढत आहे असा सुर समोर आला. अभियांत्रिकीची पदवी घेऊन लाखो तरुण सध्या बेरोजागर आहेत. त्यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न  केला. त्यातून अनेक प्रतिक्रीया मिळाल्या. शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यामध्ये असलेल्या कमतरता अभियंत्यांनी प्रमाणिकपणे सांगितल्या. तर काहींनी शासनावर खापर फोडले. मात्र यातून एक गोष्ट नक्की  जानवली ती म्हणजे तरुणांना उंच भरारी घ्याची आहे, त्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे.  

मेकॉनिकल इंजिनियर अजिंक्य भालेराव म्हणाला, 'अभियंत्यांच्या बेरोजगारीचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे राज्यातील 'अनेक महाविद्यालये' आहेत.अभियांत्रिकीचे शिक्षण देणारे राज्यात बहुसंख्य महाविद्यालय उपलब्ध आहेत. प्रवेश क्षणता पुर्ण करण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीसाठी प्रवेश दिला जातो. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगार अभियंत्याची संख्या वाढत आहे.'

सिव्हील इंजिनियर आनंद वाघमारे म्हणाला, 'सरकार कोणत्याही महाविद्यालयांना मान्यता देऊन अभियांत्रिकीची गुणवत्ता कमी करत आहे. चार भिंती उभा करुन अभियांत्रिकी महाविद्यालयाचा बोर्ड लावला जातो. महाविद्यालयाची चौकशी न करता विद्यार्थी थेट प्रवेश घेतात मात्र, अशा महाविद्यालयात कधीही प्रॉक्टीलक नॉलेज दिले जात नाही, विद्यार्थ्यांना फिल्डवर घेऊन जात नाही. विद्यार्थ्यांना शिकवलेल्या संकल्पना पाहून स्पष्ट होत नाहीत तर प्रत्यक्ष  अनुभवातून  आणि कृतीतून स्पष्ट होतात. मात्र याच कृतीची कमतरता महाविद्यालयात असते. शेवटी विद्यार्थी घोकंपट्टी करुन पास होतो मात्र प्रत्यक्ष ज्ञान शुन्य असते. अशा विद्यार्थी स्पेर्धेत टिकत नाहीत, त्यामुळे बेरोजगार अभियंत्याची संख्या वाढते.

उत्कर्ष भोसीकर म्हणाला. 'अभियांत्रिकी क्षेत्रात बेरोजगारी वाढण्याची मुळ दोन कारणे आहेत. एक कोणताही सुशिक्षित बेरोजगार अभियंता हा काम करण्यासाठी जेंव्हा स्पर्धेत उतरण्याचा प्रयत्न सुरू करतो तेंव्हा त्याला प्रशासकीय अडचणींना (वाटप- जे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला मान्य नसतं) तोंड द्यावे लागते त्यामुळे हा अभियंता उद्योग क्षेत्रात करिअर करायचं धाडस करत नाही. दुसर म्हणजे आळशीपणा. आपल प्रमाणपत्र दुसऱ्याला (राजकीय अथवा त्या क्षेत्रातील दिगग्ज ज्यांनी आपल्या मनात भीती घातली आहे अश्यांना) देऊन त्यावर येणाऱ्या टक्केवारीत समाधान व्यक्त करतो आणि स्वत: कंत्राटी तुटपुंज्या वेतनावर नौकरी करतो व कायमस्वरूपी बेरोजगार राहणे. आज अभियंता दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा व विनंती, आपण अभियंता आहात हे लक्षात घेऊन उद्योग क्षेत्रात अभियंत्याची कार्यसिद्धी करावी.

कुशल तंत्रज्ञ कृष्णा गाडेकर म्हणाले की, अभियांत्रिकी आणि एमबीबीएस असे दोनच क्षेत्र आहेत. ज्या क्षेत्रात तरुणांचा जास्तीत जास्त कल आहे. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश न मिळाल्यामुळे विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळतात. त्यामुळे अभियांत्याची संख्या वाढत आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण घेतल्यानंतर नौकरी मिळण्याची शक्यता कमीच असते. आणि जर मिळाली तर 10 ते 15 हजार अश्या तुटपुंज्या पगारावर समाधान मानावं लागते. काहींना तर नौकरी पण मिळत नाही. अश्या अवस्थेत तरुण तणावात जातो. आपल्या जीवाचं बरेवाईट करतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News