या वयातील मुलं रात्री का जागतात?

सुरज पाटील (यिनबझ)
Wednesday, 24 April 2019

गेले काही दिवस लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा गुलाल उडवला जात होता, त्यामुळे कित्येक तरुणांची झोपमोड झाली असेलच,  हे नक्की. पण पाहायला गेल्यास खरंच आठरा ते पंचविस वयोगटातील मुलं मोठ्याप्रमाणात वेगवेगळ्या कारणाने जागे असतात, हे नक्की.

गेले काही दिवस लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा गुलाल उडवला जात होता, त्यामुळे कित्येक तरुणांची झोपमोड झाली असेलच,  हे नक्की. पण पाहायला गेल्यास खरंच आठरा ते पंचविस वयोगटातील मुलं मोठ्याप्रमाणात वेगवेगळ्या कारणाने जागे असतात, हे नक्की. त्यामुळे तरुण आणि तरुणींची जागे राहण्याची कारणे नेमकी काय आहेत, हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

तरुण वयात आल्यानंतर मुलांना वेगवेगळी व्यसने लागत असतात, ज्याप्रकारे सिगारेट ओढणे, ड्रिंक करणे, मावा खाणे ही व्यसने जशी तरुणांना जडलेली असतात, त्याचबरोबर मोबाईलचे व्यसनही मोठ्याप्रमाणात तरुणांना लागलेले असते. अशाच काही खास गोष्टींची मांडणी या लेखातून आपण करणार आहोत.

तरुण किंवा तरुणी वयात आल्यानंतर लैगिंक आकर्षणाच्या बोगद्यात सापडत असतात. काहीवेळा त्यांच्याकडून चुकून काही गोष्टी होत असतात, तर काहीवेळा मुद्दामहून तरुण आणि तरुणी चुकीच्या गोष्टी करत असतात. पॉर्न व्हीडिओ बघणे, व्यसनांच्या आहारी जाणे, चुकीच्या गोष्टी करणे अशा आणि अनेक गोष्टी त्यांच्याकडून केल्या जात असतात. या सगळ्यात भर म्हणजे घरच्यांकडून मिळालेलं स्वातंत्र.

घरच्यांकडून मिळालेलं स्वातंत्र…
तरुण आणि तरुणी, एका विशिष्ट म्हणजे आठराव्या वर्षात पदार्पण करतात, त्यावेळेला ते समजूतदार झाल्याची घोषणा त्यांच्या घरच्यांकडून  केली जाते आणि याचाच फायदा तरुणांकडून उठला जातो. त्यातील म्हत्वाचे कारण म्हणजे मोबाईलचा अतीवापर...

मोबाईलच्या अतीवापराचे दुष्परिणाम...
मुख्यत: रात्री जास्त वेळ जागे राहण्याचं कारण म्हणजे तरुणांकडे असलेला मोबाईल आणि त्याचा अतिवापर. रात्री उशिरापर्यंत मित्र-मैत्रीणींशी चॅटिंग करणे, फोनवरती वेगवेगळे व्हीडिओ पहाणे, काही वेळेस पॉर्न व्हीडिओ पहाणे, गेम खेळणे, गाणी ऐकणे, वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घेणे अशा अनेक गोष्टींच्या वापरासाठी तरुण आणि तरुणी रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोनचा वापर करत असतात.

आठरा चे पंचविस या वयोगटातीलच तरुण आणि तरुणी जागे का राहतात?
तसं पहायला गेल्यास, कमी-जास्त प्रमाणात सर्वच वयोगटातील मुलं-मुली, तरुण-तरुणी, महिला- पुरूष आणि आजी-आजोबा रात्री उशिरापर्यंत जागे असतातच. पण त्यात जास्त प्रमाण असतं, ते म्हणजे आठरा ते पंचविस या वयोगटातील तरुण-तरुणींचं. या वयोगटाचा अभ्यास केल्यास एक गोष्ट अशीही समोर येते की, करिअरमध्ये काहीतरी वेगळे करुन दाखवण्याची जिद्द याच वयात असते. मेहनत घेणे, जास्त प्रमाणात अभ्यास करणे, वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घेणे, मोबाईलच्या सहाय्याने अभ्यास करणे, अभ्यासाच्या संबंधीत व्हीडिओ पाहणे अशा सर्व गोष्टी तरुण आणितरुणी करत असतात; पण तीतकाच वेळ ते, वायफळ आणि गरज नसलेल्या गोष्टींना देत असतात, म्हणून या वयातील मुलं रात्री जागतात...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News