प्रेम आणि लग्नात तरुण गल्लत का करतात?

डॉ. राहुल दासु इंगळे
Friday, 28 February 2020

प्रेमा नंतर ठरावीक लोकांचा समज हा लग्नासाठीच पुढाकार घेण्याचा प्रयत्नं करतो, लोकं प्रेमामध्ये आणि लग्नामध्ये गल्लत का करतात हें मला अजुन समजले नाही.

प्रेमा नंतर ठरावीक लोकांचा समज हा लग्नासाठीच पुढाकार घेण्याचा प्रयत्नं करतो, लोकं प्रेमामध्ये आणि लग्नामध्ये गल्लत का करतात हें मला अजुन समजले नाही.

असो पण मी आज ज्यांच्यासाठी लिहितो आहे ते माझे लग्नं ठरत नसलेल्या मित्र आणि मैत्रिणी साठी कारण टाइम्स ऑफ इंडिया यांच्या एक वर्षाच्या आकड्यांनुसार ५७ मिलियन लोक लग्नं न ठरत असल्यामुळे डिप्रेशन मध्ये जातात. महत्वाची बाब म्हणजे मी लग्नाला बंधन मानतो ते माझ स्वतःच मत आहे. पण तरी काही मित्रांना लग्नं करतांना मुलींकडुन नकार येतात किंवा मुलीला मुलांकडुन नकार येतात, हे सर्व साहजिकच असत. तरी काही लोकांना वाटत की जे काही होते ते फक्त त्यांच्या सोबतच घडत किंवा त्यांच नशीब फुटकं आहे. अश्याना मला आवर्जुन सांगा वाटेल की लग्न जुळने किंवा प्रेम होने या गोष्टी लोकांनी घडवुन आणायच्या नसतात तर त्या आपण स्वतः करायच्या असतात आणि त्या आपसूक घडत जातात .

पसंद करके प्यार नही किया जाता,
प्यार करके पसंद किया जाता हैं.

ठिक आहे काही लोक यात मागे असतात,
त्यामधले काही लोक प्रेम करतात पण ज्या व्यक्तीवर करतात त्या व्यक्तीपासुनच लपवुन ठेवतात, मी अश्या लोकांनी स्वतःच्या भावनांवर गुन्हा केला अस म्हणेल. माणसानं मोकळ असाव स्वतःच्या भावना व्यक्त करायला शिकावं, कारण शाब्दिकरित्या व्यक्त होण्याला अजुन पर्यंत तरी गुन्हा होत नाही. काही व्यक्ती प्रेम करतात, रात्ररात्र भर च्याटिंग करतात, सोबत डिनर करतात पण लग्नाची वेळ आली की आई वडिलांवर निर्णय थोपावतात, प्रेम करतांना, च्याटिंग करतांना, डिनर करतांना त्यांना आई वडील आठवत नाही फक्त लग्नं करतानाच आठवतात, आई वडिलांना रिस्पेक्ट द्यावा पण सगळ आटोपल्यानंतर किती कमकुवत आहोत आपण आयुष्यात निर्णय घेण्याच्या ऐन वेळी आपण दुसऱ्याला निर्णय घेण्यासाठी प्रवृत करतो. काही व्यक्ती मुलीने किंवा मुलाने दिलेल्या लग्नाबद्दलच्या नकाराला मनाला लावून घेतात आणि स्वतःला कमी लेखतात, निराश होतात त्यांनी लक्षात घ्याव की जगातली कुठलीच व्यक्ती तुम्हाला निराश करू शकत नसते, तुम्ही स्वतः तसा विचार करून निराश होत असता.

पतझड के बाद आते हैं
दिन बाहार के
जिना क्या जिवन से हारके .

काही व्यक्ती लग्नाला आयुष्यातील शेवटचा टप्पा समजतात आणि त्यानंतर त्यांच आयुष्य पालटेल या आशेवर असतात, पण त्यांनी लक्षात घ्याव लग्नं हा आयुष्यातील टप्पा आहे तो पूर्ण केला तरी नो प्रॉब्लेम आणि नाही केला तरी नो प्रॉब्लेम एव्हढ साध आहे. कोणाच्या येण्या जाण्याने आयुष्य कधी थांबत नसत, आयुष्य चालत आहे आणि चालत राहणार आहे. माणसानं करियरच्या धाग्यात लग्नाला गुंडाळून ठेवण चुकीच आहे, काही लोकं करियर न घडण्याच कारण लग्नं सांगतात, तर काही करियर घडण्यासाठी लग्नाची गरज आहे अस म्हणतात, करियर घडवण्यासाठी माणसांन स्वतः ठाम असाव लागत, लग्नं वैगरे हे दुय्यम असत. माणसानं एकट आयुष्य न काढणे, किंवा लग्न ठरत नसुन देखील ठरण्याची अपेक्षा ठेवणे म्हणजे स्वतःला कमी समजणे अस मी मानतो.

एका खिडकीत पाखरांने याव
आणि खोलीत क्षणच थांबुन,
दुसऱ्या खिडकीतुन निघुन जाणं,
तसा कोणताही विचार,
पुढच्या क्षणी खोली रिकामी .
अस आयुष्य जगायचं असत .
भारतीय समाज व्यवस्थेनुसार प्रत्येकाने लग्नं केलच पाहिजे ही समज ज्यावेळी कमी होईल त्यावेळी तरुण तरुणी हे निराशाजन्य आयुष्य न जगण्यासाठी तयार होतील. माणसानं रंग, रूप, वेष मध्ये स्वतःला सुंदर मानाव, ना की समोरच्या व्यक्तीनुसार ठरावाव प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्याची गाडी स्वतःच चालवावी दुसऱ्याला चालु देणे म्हणजे स्वतःवर अत्याचार करणे अस मी मानतो.

कोशिश करना की जिंदगी मैं
वह शक्स आपको हमेशा
मूस्कूराता हुवा मिले जो
रोज आपको आईने मैं
दिखाई देता हैं .

महत्वाच म्हणजे लग्नं हे ठरावीक काळात, ठरावीक व्यक्ती सोबत केल जात पण प्रेमाच तस नाही ते कधीही केल जाऊ शकत त्यामुळे प्रेमाला प्रथम प्राधान्य द्याव आणि आयुष्य मनमुराद लुटाव
बिना कोई झीझक के.
आणि स्वतःच आयुष्य स्वतःहा घडवत जावं .
दिल की कलम से
चाहत का हम,
पहला एहसास लिखेगे
हम अपनी मोहब्बत का नया इतिहास लिखेगे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News