मुली सिगारेट का पितात? एकदा वाचाच...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 April 2019

देशातल्या तरुण आणि तरुणींचे सिगारेट ओढण्याचे प्रमाण जास्तप्रमाणात वाढले आहे. त्यामागेसुध्दा वेगवेगळी कारणे आहेत.. याच कारणांवरती टाकलेली ही एक नजर...

देशातल्या तरुण आणि तरुणींचे सिगारेट ओढण्याचे प्रमाण जास्तप्रमाणात वाढले आहे. त्यामागेसुध्दा वेगवेगळी कारणे आहेत.. याच कारणांवरती टाकलेली ही एक नजर...

प्रत्येकवेळी टेंशन हा एकच मुद्दा समोर करून आजकालची तरुणाई सिगारेट ओढत असते, पण सवय झाल्यानंतर काहीवेळा टेंशन  नसतानाही ही तरुण मंडळी सिगारेट ओढत असतात आणि त्यातच भर म्हणजे तरुणींमध्येही हे व्यसन जास्तप्रमाणात असल्याचे एका सर्वेच्या माध्यमातून पुढे आले आहे...

तरुण - तरुणी सिगारेट का ओढतात...
सिगारेट ओढण्यामागे काय कारणे असू शकतात...
तुम्हाला सिगारेटचे व्यसन सोडायचे आहे?

आज-काल प्रत्येक तरुण आणि तरुणींचे एक वयक्तीक आणि फिट शेड्यूल असलेलं लाईफ असते. पण त्या बिझी शेड्यूलमध्ये सिगारेट ही गोष्ट खूपवेळा इंटरफेअर करत असते. त्या गोष्टीला आपण काहीवेळा टाळत असतो, तर काहीवेळा नाहीच. म्हणून सिगारेट ओढण्याकडे आपला कल वाढला आहे. पहायला गेल्यास 'टेंशन' हा जरी मुख्य केंद्रबिंदू असला तरी, आकर्षण, मजा, टाईमपास, आणि बरच काही, जे त्या सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला वाटत असेल... अशी वेगवेगळी कारणे असू शकतात.

असो, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी म्हणून जर आपण सिगारेट ओढण्याकडे दुर्लक्ष दिले, तर नक्कीच आपण सिगारेटचं लागलेलं महाव्यसन सोडू शकतो.

ते कसं तेही पहा...
ज्यावेळी सिगारेट ओढण्याची तलफ येते, त्यावेळी तुम्ही एखादे चॉकलेट खा.
चॉकलेट आसपास नसेलच तर हेडफोन वापरून व्हिडाओ पाहत रहा, गाणी ऐका.
फोनवरती वेगवेगळे फोटो बघत रहा.
त्यावेळी कोणाशी तरी / सहकार्याशी बोला.
ऑफिसमध्ये असाल आणि सिगारेट ओढावीशी वाटली तर ते न करता तुमच्या मैत्रिणीशी, मित्राशी, घरच्यांशी फोन करून नक्की बोला..
.

एकंदरित तुम्हाला सिगारेट ओढावीशी वाटते, त्यावेळी तुम्हाला जे आवडतं आणि योग्य आहे ते काम करा, नाहीतर असं व्हायला नको की, एक व्यसन सोडण्याच्या नादात दुसऱ्या व्यसनाच्या आहारी... याची खबरदारी देखील घ्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News