रियाचा युरोप खर्च सुशांतने का केला? रियाने दिले सडेतोड उत्तर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 August 2020

सुशांतने तिचा सर्व खर्च केला असा आरोग सिंग कुटुंबियांकडून केला जात आहे. यावर रियाने सर्वप्रथम स्पष्टीकरण दिले.

मुंबई : सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीवर विविध आरोप केले जात आहेत. यावर रियाचे मौन वृत्त धारन केले होते, मात्र आघाडीच्या एका न्युज चॅनलला रिया चक्रवर्तीने मुलाखत दिली, या मुलाखतीत चक्रवर्तीने अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तर दिले. रिया युरोप ट्र्रिपवर गेली होती, त्यावेळी सुशांतने तिचा सर्व खर्च केला असा आरोग सिंग कुटुंबियांकडून केला जात आहे. यावर रियाने सर्वप्रथम स्पष्टीकरण दिले.

तुम्ही सुशांतच्या पैशावर जीवन जगत होतात? असा आरोप सुशांतचे फॉन्स करत आहे, असा प्रश्न अॅकरने रियाल विचारला. त्यावर रिया म्हणाली की, मला एका फॉशन कार्यक्रमासाठी पॅरिसला बोलावण्यात आले होते, त्यासाठी माझी बिझनेस क्लास तिकीट बुक होती, मात्र सुशांतने माझी बिझनेस तिकीट रद्द करुन फस्ट क्लास तिकीट काढले आणि संपुर्ण ट्रिपचे नियोजन केले. त्यांनी माझ्या राहण्याचा, खाण्याचा, हॉटेलचा सर्व खर्च केला, त्याची प्रियसी असल्यामुळे मला कम्फर्ट वाटले, सुशातला एका अभिनेत्या सारख जीवन जगण आवडायच. 'लिव्ह लाईफ किंग साईज' यावर सुशांतचा विश्वास होता' असे रियाने सांगितले.

कशी होती सुशांतची लाईफस्टाईल?

रियाने सुशांतच्या लाईफस्टाईल विषय माहिती दिली. सुशांतने अनेक वर्षापुर्वी थाईलॉडची ट्रिप केली होती. या ट्रिपमध्ये ७० लाख रुपये खर्च केले. स्वत:चे खासगी विमान घेऊन सुशांत थायलॉडला गेला होता. जवळच्या व्यक्तींवर सुशांतला खर्च करणे आवडत होते. आम्ही एक कपल सारखे राहत होतो, तरी देखील त्याच्या पैशावर जीनव जगत नव्हते, असे रियाने स्पष्ट केले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News