YES BANK फाऊंडरच्या मुलीला का म्हटले जाते मिस्ट्री गर्ल?

यिनबझ टीम
Saturday, 14 March 2020

आयपीएल -8 मध्ये राणा कपूर म्हणजेच येस बँकेचे फाऊंडर यांची मुलगी राखी कपूर हिचा एक फोटो खूपच व्हायरल झाला होता. ती मुंबई इंडियन्सला साथ देत होती अशा प्रकारचा तो फोटो त्यावेळी हजारो लोकांनी ऑनलाइन सर्चिंगसुद्धा केला होता. त्यावेळेस ती म्हणाली होती, कौतुक केल्याबद्दल धन्यवाद मात्र मी पहिल्यापासून विवाहीत आहे, हे तुमच्या लक्षात असू द्या.

2015 मध्ये कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ आमने-सामने होते. तो सामना मुंबई इंडियन्सने जिंकला, पण एक चेहरा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. व्हायरल चेहरा दुसरा कोणी नसून येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांची मुलगी राखी कपूर टंडन हिचा होता. त्यावेळेस ती चर्चेतदेखील आली होती.

त्यावेळी ती मिस्ट्री गर्ल म्हणून ओळखली गेली होती, मात्र नंतर तिची ओळख चांगलीच लोकांना पटली. आज पुन्हा एकदा ती आणखी काही कारणांमुळे चर्चेत आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या बाबतीतही ती ईडीच्या रडारवर आहे. सध्या राणा कपूरला अटक करण्यात आली असून ते 11 मार्चपर्यंत ईडीच्या ताब्यात होते, त्यानंतर त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News