तरुणाईमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण का वाढतय?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  •  नेमका आत्महत्येचा विचार तरुणांच्या मनात कसा येतो? तरुण टोकाची भुमिका का घेतो?  त्यामागच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न यिनबझने केला. 

मुंबई : जगामध्ये आत्महत्या करण्याच प्रमाण वाढल आहे. सरासरी तरुण मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. नेमका आत्महत्येचा विचार तरुणांच्या मनात कसा येतो? तरुण टोकाची भुमिका का घेतो?  त्यामागच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न यिनबझने केला. 'तरुण वर्गामध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण का वाढतय?' या विषयावर यिनबझच्या विविध व्हॅट्सअॅप ग्रुपवर चर्चा करण्यात आली. त्यातील विद्यार्थ्यांनी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया आम्ही देत आहोत.

तरुण वर्गामध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आत्महत्या करण्याचे अनेक कारणे असू शकतात. बऱ्याच वेळा असे होते की मुलांचे आई वडील जास्तीत- जास्त टक्केवारी मुलाने घेतली पाहिजे म्हणून दबाव टाकत असतात. याचा परिणाम तरुणांच्या मानसिकतेवर होतो. शेवटी आत्महत्या करण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय सुचत नाही. प्रेमप्रकरण, शिक्षणाचा ताण, घरच्यांचा ताण, भरपूर शिक्षण घेऊन सुद्धा नौकरी न मिळणे इ आत्महत्या करण्याचे कारणे आहेत. पण आत्महत्या करणे हा शेवटचा पर्याय नाही. आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नसतात. आत्महत्या करण्यापूर्वी आई-वडिलांचा थोडातरी विचार तरुणांनी करायला हवा.
- कृष्णा गाडेकर

तरुणांनी आत्महत्येला समस्येतून निघण्याचा मार्ग बनविला आहे.  किनवट शहर मनसे अध्यक्ष सुनील इरावार यांनी राजकारनासाठी पैसे आणि जात नसल्यामुळे आत्महत्त्या केली. स्वतः कडे भरपूर पैसे असताना सुद्दा सुशांत सिंग राजपूतने आत्महत्त्या केली. काही गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या नाही की, लोक आत्महत्या करतात. मानसिक ताण तणाव हे एक मोठ कारण आहे. पेपरमध्ये फेल झाल्यावर, घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे मूल आत्महत्या करतात. एखाद्या गोष्टीचा राग आला की, रागाच्या भरात अत्महत्या करतात.
- प्रतिक भालेराव

आत्महत्यांची भरपूर कारणे आहेत, यामध्ये प्रामुख्याने एखादी गोष्ट माणसासारखी झाली नाही तर तो नैराश्यात जातो. त्यावेळेस आईवडिलांचा किंव्हा मित्रांचे सहकार्य मिळणे आवश्यक असते. अशा वेळेस आपण मानसिक रित्या व तसेच भावनिक रित्या खंबीर असणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपणास नैराश्य मध्येच पडायचे नसल्यास दुसऱ्याकडून कमी अपेक्षा ठेवा. किंवा दुसऱ्यावर अवलंबून राहू नक्का, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. आपल्याला काय केल्याने आपण मोठे होऊ हे मनात ठेवा आणि मेहनतीने ते मिळवा. महापुरुषांचे प्रेरणादायी पुस्तके वाचली पाहिजेत आणि नेहमी आनंदी असल पाहिजे...!
- गणेश गायकांबळे

तरूण हा वेगवेगळ्या कारनानी आत्महत्या करतो, उदाहरणार्थ नैराश्य, प्रेम विवाह, कौटुंबिक भांडन, आसे आनेक कारने आसु शकतात, परंतु जगाचा पोशींदा आसनारा शेतकरी मात्र अजूनही या देशात आत्महत्या करतो, या मागील मुख्य करनं कोणती आहेत यावर चर्चा व्हावी.
- जगन्नाथ गायकांबळे
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News