बहुतेक भारतीयांची ऑफिसमध्येच का असतात लफडी

यिनबझ टीम
Friday, 8 November 2019

सर्वांखेरीज ऑफिसमध्ये छुप्या पद्धतीने काहीतरी अजून चालू असतं, त्याचाच आढावा आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ऑफिसमधून मिळणाऱ्या नवनवीन जबाबदाऱ्या, कामाचे ओझे, टार्गेट, मिटींग्स आणि कामगिरीचे पुनरावलोकन याची कटकट रोज सुरूच असते, याशिवायही कार्यालयात काहीतरी विशेष असते ते म्हणजे लोकांसोबत असलेले आपले संबंध. ऑफिसमध्ये कार्यरत असणारे सहकारी काही वेळेनंतर खूप चांगले मित्र बनतात. त्यांना एकमेकांबद्दल बर्‍याच गोष्टी माहिती असतात. गप्पागोष्टींपासून चांगले मित्र, शत्रू आणि सर्व काही, पण या सर्वांखेरीज ऑफिसमध्ये छुप्या पद्धतीने काहीतरी अजून चालू असतं, त्याचाच आढावा आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

भारतात लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी कार्यालय एक नवीन आकर्षण केंद्र बनत आहे. 'इंडिया टुडे सेक्स सर्वे 2019' मधून ही माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की मोठ्या संख्येने भारतीयांना कार्यालयात सेक्स करण्याची इच्छा असते. मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या समाजशास्त्रज्ञ 'अनघा सरपोतदार' यांच्या मते, आता कार्यालयातील औपचारिकता संपुष्टात येत असून लोकांमधील जवळीकता वाढत आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे लोक आता कार्यालयात आपल्या हद्द ओलांडत आहेत. सध्या कार्यालयात लैंगिक छळ हा एक मोठा मुद्दा बनला असल्याचेही त्या म्हणाल्या. 

'इंडिया टुडे सेक्स सर्वे 2019' मध्ये लोकांना बेडरूमपासून बोर्डरूमपर्यंत त्यांच्या लैंगिक जीवनाबद्दल प्रश्न विचारले गेले. या सर्वेक्षणात भारतीय तरुणांच्या लैंगिक वर्तनातील बदलांविषयी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ही आकडेवारी देशातील सर्व छोट्या मोठ्या शहरांतून घेण्यात आली आहे. या सर्वेक्षणात लोकांना विचारले गेले की त्यांनी कधीही ऑफिसमध्ये सेक्स करण्याचा विचार केला आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात, लोकांनी 'हो' किंवा 'नाही' मध्ये उघडपणे आपला प्रतिसाद नोंदविला. सर्वेक्षण केलेल्या चारपैकी एकाने सांगितले की ते ऑफिसमधील सेक्सबद्दल विचार करतात.

आपण आपल्या जोडीदाराबरोबर सेक्सबद्दल विचार केला आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात इंदौरमधील 85 टक्के, लखनौमधील 46 टक्के आणि गुरुग्राममध्ये 62 टक्के लोकांनी हो असे उत्तर दिले आहे, या सर्वाचं एकमेव कारण असल्याचे समजून येते की आपल्या ऑफिसमध्ये असलेले टेंशन हे आपल्या पार्टनरला चांगल्या प्रकारे माहित असते आणि आपणही त्याच्याशी खूप गोष्टी शेअर करत असतो, त्यामुळे आपल्या पार्टनसोबत असलेलं आकर्षण आपल्या मनात वाढत जाते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News