तरुणाईमध्ये व्यसनाच प्रमाण का वाढतय?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 August 2020
  • आजची चर्चा, माझा आधिकार, माझे मत
  • गरीब - श्रीमंत सर्वच स्तरातील तरुण व्यसनाच्या खाईत बुडाली आहेत. या खाईत अनेकांची प्राणज्योत मावळली.
     

मुंबई : तरुणाईमध्ये दिवसेंदिवस व्यसनाचे प्रमाण वाढत आहेत. व्यवसनामुळे एक सुशिक्षित पिढी बरबाद होत आहे. गरीब - श्रीमंत सर्वच स्तरातील तरुण व्यसनाच्या खाईत बुडाली आहेत. या खाईत अनेकांची प्राणज्योत मावळली. तरुणाईला व्यसनापासून मुक्त करण्यासाठी काही स्वंयसेवी संस्था प्रयत्न करत आहे. स्वंयसेवी संस्थांना व्यसंगी दात देत नाहीत. त्यामुळे व्यसनाच प्रश्न गंभीर होत चालला आहे. 'तरुणाईच व्यसनाच प्रमाण का वाढतयं?' या विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपमध्ये आज मनोसोक्त चर्चा करण्यात आली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत. 

पालकांनी मुलांना अवास्तव स्वातंत्र्य दिले त्यामुळे व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. पालकांनी कोणते स्वतंत्र्य मुलांना द्यावे याचा नक्की वाचार करावा.
-उत्कर्ष भोसीकर

तरुणाईमध्ये व्यसानचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. काही प्रमाणात पालव याला जबाबदार आहेत. पालक मुलांच्या छोट्या चुकांवर दुर्लक्ष करतात. वाईट संगतीमुळे व्यसन जडण्याच प्रमाण अधिक आहे. प्रशासन व्यसनमुळक्तीचं आश्वासन देते पण प्रत्येक्षात काहीच करत नाही. 
-कृष्णा गाडेकर

फक्त हे करा
हजार मैलांचा प्रवास एका निर्णयाने सुरू होतो. व्यसनापासून मुक्त होण्याचा निर्णय स्वत: आनंदाने घ्या. तो निर्णय घेण्यासाठी कठीण जाईल. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावे. सवय विकसित केलेल्या असतात त्या बदलता येतात. त्यासाठी सलग 21 दिवस सराव करावा लागतो. २१ दिससाचा कालावधी जास्त वाटेल परंतु हे नियम पाळल्यावर त्याचा परिणाम नक्कीच दिसेल.

आजची तरुण पिढी ही खूप व्यसनाच्या आहारी गेलेली दिसत आहे, त्याचे कारण लक्षात घेता दिसून येते की, बेरोजगारी अशिक्षित पणा, प्रेम प्रकरण, दारिद्र्य असे खूप कारण दिसून येतात, पालकाचे मुलावर दुर्लक्ष असणे. तरीही तरुण मुले कॉलेज लाइफ मध्ये एंजॉय म्हणुन व्यसन करत असतात. कॉलेज कट्टा असो किंवा सोसायटीचा बाक, नवीन वर्षाची पार्टी असो, चार तरुण टाळकी जमली की त्यांचे पहिले प्रश्न असतात..‘‘तू कोणती दारू पिणार? तू कोणती सिगारेट ओढतोस? तू दारू पित नाहीस?’’ एखादा मुलगा मद्यपान करत नसेल तर त्याला कमी दर्जाचे समजले जाते. धूम्रपान आणि मद्यपान एक ट्रेंड झाला आहे. थर्टीफस्र्टला जिकडे तिकडे दारू पिऊन िधगाणा घालत नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा पडली आहे. थर्टीफर्स्ट म्हटले की दारू पिऊन दंगा, घालणे असेच काहीसे समीकरण होऊन बसले आहे. सरकारी आकडे सांगतात ३ महिन्यात जेवढी दारू विकली जात नाही त्याहूनही अधिक दारू एकटय़ा ३१ डिसेंबरचा दिवस पिऊन जातो. आनंद साजरा करण्याची पद्धत बदलत चालली आहे, दारूशिवाय आनंद साजरा केला जात नाही आणि जी मंडळी दारूकामात भाग घेत नाहीत, त्यांनी आनंदोत्सव साजरा केलाच नाही असे समजले जाते.

आजकालच्या तरुण पिढीला व्यसन करणे ही खूप साधी गोष्ट वाटते. आपल्या आजूबाजूच्या हायक्लास म्हणजे उच्चभ्रू लोकांमध्ये राहायचे असेल तर त्यांच्या स्टेटसप्रमाणे वागायला पाहिजे असे त्यांना वाटते. ताण पडला सिगारेट आणि अतिच दु:ख झाले की दारूच्या स्वाधीन व्हायचे ही एक स्टाईल बनली आहे.
देशांचे भविष्य फक्त तरुणांच्या हातात असते, तरुणाने जर असे व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःचे भविष्य खराब केले तर देशाच जाऊदे हो, त्यांच्या आई वडिलांच कस होईल, हे विचार तरुण अजिबात करत नाहीत. एखादा पीत नसेल तर त्याला फोर्स केले जाते. असे करून सवय लागत जाते, असे करून करून खूप तरुण व्यसनांच्या आधीन गेलेले आहेत. त्यामुळे तरुणाने थोडासा विचार करायला हवा.
- सुरज कांबळे

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. देशातील अनेक तरुणांनी आपल्या बलिदानाची पर्वा न करता देश संरक्षण ते विकसनशील राष्ट्र निर्माण करण्यास मदत केली आहे. तसेच पुढील देशाचे भविष्य देखील तरुणांच्या हाती आहे.पण दुःखाची गोष्ट ही की आजच्या तरुणाईत दिवसेंदिवस व्यसनाचे प्रमाण वाढतंय... का वाढतंय? याचे वेगवेगळे करणे आहेत.परीक्षेत नापास झाल्यामुळे,कौटुंबिक वादा-वाद मुळे, प्रेमभंगामुळे, गुन्हेगारी वृत्तीमुळे,मानसिक ताण -तणावामुळे, लग्न न होण्यामुळे,हाताला काम नसल्यामुळे,अपमान जनक वागणूक मिळाल्यामुळे, गरिबीमुळे, कर्जाची परतफेड न करू शल्यामुळे ,मित्रा सोबत केल्या जाणाऱ्या पार्ट्यामूळे असे अनेक कारणे आहेत ज्यामुळे  आजच्या तरुणाईत व्यसनाच प्रमाण वाढतंय.  व्यसनामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या उदभवतात जसे की..शारीरिक समस्या, मानसीक समस्या, कौटुंबिक समस्या, आर्थिक समस्या, सामाजीक समस्या इत्यादी. covide-19 च्या कालावधीत सरकारने देशी दारू दुकाने याना परवानगी दिली असता अनेक ठिकाणी दुकाने सुरू करण्यात आली त्यामुळे अनेक तरुण वर्ग या व्यसनाच्या आहारी गेला.आजचा तरुण  व्यसनामुळे आपल्या हाताने आपले स्वतःचे आयुष्य संपवत आहे.याचा नक्कीच तरुणांनी विचार करायला हवा. "वृत सेवेचे,ध्येय व्यसनमुक्त महाराष्ट्राचे!!
- सुनिल कोटकर

टीव्ही सिनेमाच तरुणांवर बरच वर्चस्व आहे. ते स्वतःला सिनेमातील हिरो समजतात. सिनेमातील हिरोच्या हातातील सिगारेट आणि दारू नकळत त्यांच्या हातात येते. नुकत्याच आलेल्या कबीर सिंग या सारख्या चित्रपटांमुळे तरुण मूल व्यसनाकडे ओढली जातात. कॉलेजमध्ये असताना मैत्रीची धुंदी असते डोक्यावर. मित्रासाठी काही पण करायला तयार असतात. त्याने आग्रह केला मनून आपण दारू पितो आणि त्याच्या आहारी जातो.
- प्रतिक भालेराव

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News