विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनामागे कोणाचा हात? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 17 December 2019

पोलिसांनी दहा विद्यार्थ्यांना अटक केली होती. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर काही धक्कादायक माहिली मिळाली.

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीच्या जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. हे आंदोलन मोडुन काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. आंदोलनादरम्यान पोलिस आणि विद्यार्थी यांच्याच चकमक झाली. या चकमकीत विद्यार्थी आणि पोलिस जखमी झाले. त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या प्रकरणात पोलिसांनी दहा विद्यार्थ्यांना अटक केली होती. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर काही धक्कादायक माहिली मिळाली.

 

केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, "पोलिसांनी अटक केलेले 10 युवक हे गुन्हेगार पार्श्वभुमिचे आहेत. त्यांनी समाजात असंतोष निर्माण करण्याच काम केले आहे." असे मंत्रालयाने सांगितले. 

 

सध्या सोशल मी़डिया एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. त्याफोटो मध्ये एका युवकाने लाल शर्ट आणि निळी पॅंट घातली आहे. शर्टवर युवकाने पोलिस जॅकेट परीधान केले. हातात पोलिसांची लाठी घेवुन तो उभा आहे. तो युवक एबीव्हीपीचा कार्यकर्ता असल्याच त्याच्या फेसबुक अकाउंट लिहल आहे. त्यामुळे जामिया मिलिया विद्यापीठाच्या आंदोलनात एबीव्हीपीचे कार्यकर्त्यांनी हिंसाचार केला असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट वरुन शेअर केला आहे. त्यासोबत एक कॅप्शन दिले आहे. पाहा फोटो, तुम्हाल कळलंच असेल, या हिंसक घटनांमागे कोण आहे, असे आव्हाड यांनी म्हटलंय.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News