जो आमच्याशी टक्कर घेईल तो चूर होईल; भाजपला कुणी दिला इशारा ?

वृत्तसंस्था
Thursday, 6 June 2019

कोलकाता : रमजान ईदनिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली. मतदानयंत्रांशी छेडछाड करणाऱ्या भाजपला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी या वेळी बोलताना दिला. 

कोलकाता : रमजान ईदनिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली. मतदानयंत्रांशी छेडछाड करणाऱ्या भाजपला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी या वेळी बोलताना दिला. 

सध्या राज्यामध्ये भाजप आणि तृणमूलमध्ये जोरदार हाणामारी सुरू असून, ममतांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सूर्य उगवल्यानंतर तो लवकर तापतो. पण, नंतर तो तितक्‍याच वेगाने थंडही होतो. मतदानयंत्रांसोबतची छेडछाड ही अशा प्रकारची आहे. हेदेखील लवकर मावळणार आहे. जो आमच्याशी टक्कर घेईल तो चूर होईल, असा इशाराच त्यांनी भाजपला दिला.
रमजाननिमित्त रेड रोड एरियातील मैदानावर सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ममता म्हणाल्या की, बंगाली संस्कृती आणि परंपरा यांचे ऐक्‍य महत्त्वाचे असून, लोक एकत्र असतील; तरच ते इतरांशी लढू शकतात. भविष्यामध्ये आम्ही सगळ्या लढाया या एकत्रितपणे लढू. तुम्ही घाबरला, तर संपून जाल. पण, लढणारे मात्र शेवटी यशस्वी होतील.

 

तृणमूल काँग्रेसचा पश्‍चिम बंगालमधील पाया भुसभुशीत झाला असल्यानेच ममता या इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रांतील फेरफाराचे आरोप करीत आहेत. त्यांचे हे आरोप बालिशपणाचे आहेत.
- सायंतन बसू, भाजपचे प्रदेश सरचिटणीस

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News