बेरोजगारीला जबाबदार कोण?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 August 2020
  • आजची चर्चा, माझा आधिकार, माझे मत
  • लॉकडाऊन नंतर बेरोजगारीचा दर अधिकच वाढला. सरकारने यावर तुटपुंजी उपाय योजना केली. मात्र बेरोजगारीवर कोणताही परिणाम झाला नाही.

मुंबई : देशात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. कोविड-१९ चा संर्सग रोखण्यासाठी केंद्र सरकारने टाळेबंदी जाहीर केली, त्यामुळे देशातील उद्योग, व्यवसाय बंद पडले. व्यावसाय व कंपन्यात काम करणारे लाखो कामगार बेरोजगार झाले. लॉकडाऊन नंतर बेरोजगारीचा दर अधिकच वाढला. सरकारने यावर तुटपुंजी उपाय योजना केली. मात्र बेरोजगारीवर कोणताही परिणाम झाला नाही. 'बेरोजगारीला जबाबदार कोण?' या विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपमध्ये आज मनोसोक्त चर्चा करण्यात आली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.  

सध्या देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याला जबाबदार सरकार आहे. सरकार बेरोजगारी संपवण्याचे आश्वासन देते पण प्रत्येक्षात काहीही करत नाही. कोरोना महामारीमुळे अनेक लोकांनी आपला रोजगार गमावला. उच्च शिक्षण घेऊन बहुसख्य तरुणाई घरी बसून आहे त्यांना रोजगार मिळत नाही. त्यासाठी युवकांनी व्यवसायाकडे वळले पाहीजे. कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो. व्यावसाय बेरोजगारीवर मात करु शकतो.
- कृष्णा गाडेकर

आजच्या स्पर्धात्मक जीवनात युवकांना स्वतःची  व आपल्या कुटूंबाची जबाबदारी प्रत्येक युवकांनाला कर्तव्यपूर्ण सांभाळावा लागतेच.तसेच सध्याच्या काळात covide-19 मुळे अनेक युवकांना (शिक्षित व अशिक्षित)आपल्या रोजगार पासून मुकावे लागले.तशेच रोजगार मिळणे कठीण होऊन बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याला जबाबदार कोण?तर याला जबाबदार सरकार व्यवस्था, शिक्षण पद्धती, व आपली स्वतःची मानसीकता आहे.उदा. सरकार एकाच वेळेस मोठी भरती काढण्याची घोषणा देत.पण भरती काही निघत नाही.या अश्या अश्वसनामुळे कितीक मुले निराश होऊन स्वतःच्या आत असलेले कौशल्य विसरतात. शिक्षणपद्धतीत कौशल्यभिमुक शिक्षण पद्धती अवलंब करावा जेणेकरून युवक स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यास वाढ होईल.
उपाय: 
1)शहरी व ग्रामीण स्तरावर mpsc व upsc प्रशिक्षण केंद्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावी.
2)बेरोजगार युवकाचा प्रत्येक वर्षी सर्वे करण्यात यावा व त्यावर समस्या-निर्धारित नवीन रोजगार युक्त योजना सुरू करावी.
3)युवक मेळावा.
4)युवकाना आवडीनुसार रोजगार करण्यास संधी द्यावी. 
5)वाढत्या औद्योगिक क्षेत्रानुसार प्रशिक्षण केंद्र सरकारने चालू करावी.
6)सरकारने ऑनलाइन रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे.
यामुळे आपल्या वाढत्या बेरोजगारीला कमी करून युवकांना नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होईल.आणि आजचा युवक बेरोजगारीच्या समस्या अंतर्गत भरकडणार नाहीत.
- सुनील कोतकर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News