ग्लोबल वार्मिंगला जबाबदार कोण?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • निळा दिसणारा समुद्र विषाणू द्रव्यामुळे पांढरा शुभ्र झाला. तापमाण वाढले, प्रदुषणात मोठी भर पडली. एकुणच संपुर्ण वातावणात बदल झाला.

मुंबई : झुळझुळणारे झरे, खळखळणाऱ्या नद्या आत प्रदुषणामुळे हिरव्यागार झाल्या आहेत. हिरवे दिसणारे डोंगर ओसाड पडलेत आहेत. निळा दिसणारा समुद्र विषाणू द्रव्यामुळे पांढरा शुभ्र झाला. तापमाण वाढले, प्रदुषणात मोठी भर पडली. एकुणच संपुर्ण वातावणात बदल झाला. या संपुर्ण ग्लोबल वार्मिंगला जबाबदार कोण? या विषयावर यिनबझच्या विविध व्हॅट्सअॅप ग्रुपवर चर्चा करण्यात आली. त्यातील विद्यार्थ्यांनी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया आम्ही देत आहोत.

जागतिक तापमान वाढ हा संपुर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. पृथ्वीच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. वाढते वायुप्रदूषण, मोठ्या प्रमाणात होत चाललेली वृक्षतोड, जलप्रदूषण इत्यादी तापमान वाढीसाठी कारणीभूत आहेत. मानवाने आपल्या दैनंदिन जीवनासाठी मोठमोठे उद्योगधंदे निर्माण केले. त्यातून निघणाऱ्या विषारी वायूमुळे ओझोन थर पातळ कमी होत आहे. तापमान वाढीमुळे बर्फ वितळत चालले आहे. त्यामुळे समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होऊन त्सुनामी येण्याची शक्यता आहे. वेळीच तापमान वाढीवर नियंत्रण  मिळवले नाही तर येणाऱ्या भविष्यात याची मानवाला फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
- कृष्णा गाडेकर

ग्लोबल वार्मिंग मानवजातीसाठी तसेच संपूर्ण प्राण्यांसाठी एक उदयोन्मुख धोका आहे. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकाबद्दल जेव्हा आपण विचार करतो त्या काळाला क्रांतिकारक युग म्हणून संबोधले गेले कारण त्या काळात औद्योगिक क्रांती घडली. मनुष्याने प्रगती केली तसेच नैसर्गिक फ्लूरा आणि प्राणी (वनस्पती) नष्ट करणे सुरू केले. जंगलतोड (वन तोडणे) यामुळे पर्यावरणीय संतुलन त्रासदायक आहे. असंतुलन वेगवेगळ्या asons तूंमध्ये आहे, वेळेवर पाऊस पडणे, उन्हाळा यापेक्षा अधिक तीव्र आणि कधीकधी उलट दिसतो, औद्योगिक विकास झाल्यावर ऑटोमेटिव्ह साधने क्लोरोफ्लोरोकार्बन्स, मोनोऑक्साइड, सीओ 2, कार्बन डायऑक्साईड सारख्या हानिकारक वायूंचे उत्सर्जन होण्यास सुरवात होते. हे वायू वातावरणात गरम ठेवण्यास जबाबदार आहेत. दिवसेंदिवस हे प्राणघातक वायूचे प्रमाण वाढत आहे. मौल्यवान झाडे तोडून नवीन पिके घेण्यास सुरुवात केल्यामुळे माती वाहून जाण्यास सुरवात होते, त्यामुळे वातावरणात ओलावा राहणार नाही. थेट सूर्यप्रकाशामुळे जमीन वाळू होण्याची शक्यता असते. साधारणपणे एकोणिसाव्या शतकापासून आतापर्यंत तापमान वाढत आहे. पृथ्वीवर तापमानात वाढ झाल्यामुळे हिमनदीही वितळू लागल्या..! 

समुद्र आणि समुद्रातील पातळी वाढीस कारणे.
अशा हानिकारक वायूंमुळे ओझोन लेयर देखील कमी होण्यास सुरवात होते, ज्यामुळे आतापर्यंत पृथ्वीवरील अतिनील प्रकाश थेट जमीनीवर पडतो, ज्यामुळे घातक रोग आणि पृथ्वीवरील सर्व सजीवांचे नुकसान होईल.

वृक्ष लागवडीमुळे सजीव प्राण्यांचे जीवन वाचू शकेल त्यासाठी त्यासाठी वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न करू. हानिकारक वायूंचे उत्सर्जन करणारे वायू वापरणे टाळू. सायकल किंवा सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा प्रयत्न करु. आपण हे करत असल्यास आपला हिरवा ग्रह कायमचा हिरवागार राहील आणि सर्व सजीव आनंदाने जगतील.
- गणेश गायकांबळे

ग्लोबल वार्मिंगला आपणच जबाबदार आहोत. कारण आपण आपल्या स्वत:च्या  स्वार्थासाठी, विकासासाठी आपण पर्यावरणाचा ऱ्हास करत चाललोय. आपण आपल्या वैयक्तीक गरजा भागवण्यासाठी मर्यादीत गोष्टीचा योग्य वापर केला पाहीजे. आपण तस न करता भौतिक गरजांसाठी नैसर्गिक गोष्टींचा आमाप वापर करत आहोत. नैसर्गिक वस्तूला पर्यायी वापर केला पाहीजे. शिकले, सवरले सुशिक्षित जानता वृक्षतोडीला जबाबदार आहे.
-हनुमान येडमे

मी सुशिक्षित आहे आणि आतापर्यंत  एकही वृक्ष तोडले नाही, खूप वृक्ष लावले आहेत, तर तुम्ही कसं म्हणू शकता की सुशिक्षित माणस यास जबाबदार आहेत, काही वर्षा अगोदर १ कोटी वृक्ष लागवड आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या देखरेख खाली झाली, ते ही सुशिक्षित आहेत तुम्ही त्यांना पण जबाबदार ठरवणार का?, 
माफ करा तुमच्या विचाराशी सहमती नाही.
-अजिंक्य भालेराव
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News