शेतकऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • एकीकडे  महापूर, दुष्काळ अशा नैसर्गीक आपत्तीने शेतीचे अतोनाथ नुकसान होत आहे. तर दुसरीकडे शेती मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आडकला आहे.

मुंबई : भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताची ६० टक्के लोकसंख्या कृषीवर आधारित आहेत. तरी देखील शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती हालाकीची झाली. एकीकडे  महापूर, दुष्काळ अशा नैसर्गीक आपत्तीने शेतीचे अतोनाथ नुकसान होत आहे. तर दुसरीकडे शेती मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आडकला आहे. यातून बाहेर येण्याचा कोणताही मार्ग शेतकऱ्यांना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अखेर आत्महत्तेचा मार्ग स्वीकारावा लागला. 'शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबरदार कोण?' या विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपमध्ये आज मनोसोक्त चर्चा करण्यात आली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत 

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या नशिबी दरिद्र दुःख का? भारताचा आर्थिक विकास दर हा शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी स्वतः उपाशी राहतो आणि दुसऱ्यांसाठी अन्न पिकवतो. सततची नापिकी, दुष्काळ यावर मात करून तो कठोर मेहनत करत असतो. देशातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि हे प्रमाण वाढतचं चाललेला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही, उत्पादन खर्च कितीही वाढला तरी तो शेती करतो. तेव्हा त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नसतो. सरकार कोणाचे पण येऊ शेतकऱ्याला न्याय कधीच मिळाला नाही. सरकार फक्त  कर्जमाफीच आश्वासन देते पण प्रत्यक्षात करत काहीच नाही. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण हे विदर्भात जास्त पाहायला मिळेल. प्रशासनाने शेतकऱ्याच्या समस्या जाणून घ्यायला पाहिजे. त्यांना कमी दरात खते, बियाणे, उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्यांच्या मालाला योग्य भाव द्यायला पाहिजे. हे सर्व लाभ जर शेतकऱ्यांना मिळाले तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. शेतकऱ्यांना योग्य तो सन्मान मिळालाच पाहिजे. ज्या दिवशी शेतकरी सुखी होईल त्या दिवशी हा देश सुजलाम, सुफलाम होईल.
- कृष्णा गाडेकर

शेती निसर्गावर अवलंबून आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ. बिहार, आसाम यासारख्या राज्यात पूर परिस्थिती गंभीर आहे. तिथल्या शेतकऱ्यांनी कोणाला जबाबदार धराव. Climate change हा आपल्यामुळेच होत आहे. आपण साधी राहणीमान अवलंबली पाहिजे. शेतीसाठी लागणारा पैसे बहुतेक शेतकरी कर्ज स्वरूपात घेतात. त्यात बँकेचा पैसा पुरत नसल्यामुळे सावकारी कर्ज काढले जाते. सावकाराचा पैसा वेळेवर दिला नाही तर त्या पैशाला चक्रवाढ व्याज लागते. त्यामुळे येईल त्या भावात ते आपला माल विकतात. सरकारच्या योजना चांगल्या असतात पण त्या शेतकऱ्यापर्यंत पोहचत नाहीत. आशा प्रकारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो आणि त्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.
- प्रतिक भालेराव

प्रत्येक वेळेस म्हणता की सरकारने कर्ज माफ केलं पाहिजे, पण त्यांनी का कर्ज माफ कराव, जर तुम्ही कोणाला कर्ज दिलात तर तुम्ही ते माफ कराल का,  हा जर खूप मोठा दुष्काळ आला असेल महापूर आला असेल तर ठीक आहे , पण प्रत्येक वेळेस सरकारनी शेतकऱ्याचे कर्ज का माफ कराव, जर असाच कर्ज माफ केलं तर त्यांच्या संचित निधी मधे किती कमतरता येईल, त्या मुळे सरकार जास्त टॅक्स अकरेल आणि ते टॅक्स सामान्य जनतेला किती महागात पडेल याची जाणीव आहे का?
-अजिक्य भालेराव

शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ का येते? कारण की तो कर्जबाजारी असतो. आणि ही परिस्थिती वर्षानुवर्षे चालत असते. इतकेच नाही तर त्याला रोज च्या संसारात खूप अडचणी येतात. तर पूरक व्यवसाय उभा करायला काही निधी ची आवश्यकता नाही लागणार का?? मग तो व्यवसाय कुठे सुरू करायचा, वातावरण कसे पाहिजे ह्या सर्व गोष्टी त्यात आल्याच. आपण फक्त वर वर चर्चा करून मोकळे होतो. पण त्या परिस्थितीची जाणीव करण्यासाठी त्या परिस्थिती जगून बघावे. आपण समजतो तेवढे सोपे नाही. कर्जमाफी नाही दिली तरी चालेल. पण शेतकऱ्याला हमी भाव द्या. शेतकऱ्याला जो भाव मिळतो आणि व्यापारी जो भाव मिळवतो यांच्यामध्ये किती तफावत असते. शेतकर्याला उत्पन्न जास्तीत जास्त कसे मिळवावे ही माहिती द्यावी, शेतकऱ्याच्या जमिनीची तपासणी व्हावी (अश्या अनेक गोष्टी असतात).  मग त्या नुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे. म्हणजे शेतकरी आत्मनिर्भर झाला पाहिजे. सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन वाढ व्हावी अशी अपेक्षा ठेवता ना? दिवाळीचे बोनस मिळावे अशी पण अपेक्षा ठेवताना? मागास वर्गासाठी सरकारने special कोटा ठेवावा अशी पण अपेक्षा असतेच ना? मग भारत हा कृषिप्रधान देश आहे तर शेती साठी विशेष सुविधा राबवायला काय हरकत आहे? सरकारला कारणीभूत ठरवत नाही, शेतकरी स्वतःच्या मलाच भाव करू शकतील अशी व्यवस्था निर्माण करावी.
- सुनिल श्रीरामे

नाफेड ला हमीभावमिळतोच ना फक्त तो थोडासा वाढवून मिळावा आणि आपल्या शेतकऱ्यांनी पण व्यापारी लोकांना माल विकण्यापेक्षा थोडासा संयम ठेवून नाफेड ला माल द्यावा
- उत्कर्ष भोसीकर

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News