'या' ९ पैकी राखी सावंतचा पती कोण?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 28 September 2019

राखीचं लग्नच झालेलं नाही असं म्हणणाऱ्या लोकांना उत्तर देण्यासाठी राखीनं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक अजब व्हिडीओ शेअर केला आहे.

मुंबई: बॉलीवूडची  कॉंट्रोव्हर्सी क्वीन म्हणजेच  राखी सावंत मागच्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. राखीनं काही दिवसांपूर्वीच लग्न केल्याच्या चर्चा आहेत. राखीनं स्वतःच या गोष्टीचा खुलासा केला होता. मात्र तिचा नवरा अद्याप प्रसार माध्यमांच्या समोर आलेला नाही. मधल्याकाळात राखी सावंतच्या घटस्फोटा पासून ते तिच्या प्रेग्नन्सी पर्यंत अनेक अफवा सुद्धा उठल्या.

राखीनं काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओमधून ती युकेला तिच्या नवऱ्याचा घरी पोहोचल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता पहिल्यांदाच तिनं तिच्या नवऱ्याचा  फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र यात ट्विस्ट आहे.

राखीनं लग्नाचा खुलासा केला असला तरीही तिच्या नवराचा  एकही फोटो तिनं अद्याप शेअर केलेला नाही. तसेच माझ्या नवऱ्याला मीडियासमोर येणं अजिबात आवडत नाही असं स्पष्टीकरणाही तिनं यावर दिलं. त्यामुळे राखीचं लग्नच झालेलं नाही असं अनेकाचं म्हणणं आहे. अशा लोकांना उत्तर देण्यासाठी राखीनं नुकतच तिच्या इन्स्टाग्रामवर एक अजब व्हिडीओ शेअर केला आहे. राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कूप व्हायरल होत आहे.

रणबीरचे VIRAL PHOTO ठरले वादग्रस्त, बॉलिवूडमध्ये उडाली होती खळबळ 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Konsa Mera husband hai

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

 

या व्हिडीओसोबत राखीनं 9 तरुणांचे फोटो शेअर केले आहेत आणि या व्हिडीओमध्ये तिनं चाहत्यांना यातील तिचा पती कोण आहे हे ओळखण्यास सांगितलं आहे. राखीच्या या पोस्टवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहे. राखीनं अद्याप तिचा पती कोण आहे हे सांगितलं नसलं तरीही या 9 पैकी कोणीतरी एक तिचा पती असल्याचं तिनं सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वीच राखी सावंतनं मीडियाशी बोलताना तिनं 28 जुलैला मुंबईच्या जे. डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये एनआरआय रितेशसोबत लग्न केल्याचा खुलासा केला होता. मात्र या लग्नाला फक्त घरातील 7-8 व्यक्ती हजर होते असं तिनं सांगितलं. पण अद्याप राखीच्या पतीला कोणाही पाहिलेलं नाही. मात्र राखी नेहमीच तिच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टमध्ये तिच्या पतीचा उल्लेख करत असते. लवकरच राखी तिच्या पतीसोबत बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये एंट्री करणार असल्याचं बोललं जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News