सोशल मीडियावर चर्चेत ठरलेला 'हा' छोटा केजरीवाल आहे तरी कोण? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 February 2020

आम आदमी पक्षाने देखील याची दखल घेत आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून या छोट्याचा फोटो शेअर केला आहे.

नवी दिल्ली : नुकतेच दिल्ली विधानसभा निवडणूक पार पडली. अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा बाजी मारत आपली सत्ता स्थापन केली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात दिल्लीकरांनी जल्लोष साजरा केल्याचे पाहायला मिळालं. या जल्लोषादरम्यानचा एक फोटो चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. तो म्हणजे "छोटा केजरीवाल"..! हुबेहूब केजरीवाल यांच्या पेहरावात हा छोटा मुलगा दिसला.  

केजरीवाल यांच्याप्रमाणे गळ्यात मफलर, डोक्यावर टोपी, मिशी, लाल स्वेटर, चष्मा अशा वेशातील छोट्या केजरीवालचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. आम आदमी पक्षाने देखील याची दखल घेत आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून या छोट्याचा फोटो शेअर केला आहे. दिल्ली विधानसभा मतमोजणी सकाळपासून सुरु झाली होती, त्यावेळेपासून हा आपच्या कार्यालयाबाहेर होता. त्याने केलेल्या पेहरावामुळे सर्वांचे लक्ष त्याने खेचून घेतले होते. 

हा मुलगा कोण आहे? अशीच चर्चा सुरु झाली. तर, या मुलाचे नाव आहे, आव्यान..! त्याच्या आई-वडिलांनीच त्याला केजरीवाल यांच्या पोशाखात तयार करून कार्यालयात आणले होते. आव्यान याचे आई-वडील केजरीवाल यांचे समर्थक आहेत. आपला मुलगा मोठा होऊन केजरीवाल यांच्याप्रमाणे व्हावा, अशी इच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

आव्यानसोबत सेल्फी काढण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यानंतर या छोट्या केजरीवालचे फोटो संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाले. आणि क्षणातच या छोट्या केजरीवालला जगभरातून पसंती देण्यात आली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News