बर झालं तुमच्या तिघातलं कोण सैन्यात नाही गेलं...

कृष्णा सोनारवडकर
Wednesday, 27 February 2019

बाबांचा फोन आला, त्यांना कदाचित दिवसभर हल्ल्याबद्दलच्या बातम्या कानावर पडल्या होत्या. पुलवामा इथे हल्ल्यात जवान शहीद झाले तेंव्हाही त्यांचा आवाज काहीसा बारीकच वाटत होता. मला म्हणतात, तिकडे वातावरण खूप गरम असेल ना रे.? 

बाबांचा फोन आला, त्यांना कदाचित दिवसभर हल्ल्याबद्दलच्या बातम्या कानावर पडल्या होत्या. पुलवामा इथे हल्ल्यात जवान शहीद झाले तेंव्हाही त्यांचा आवाज काहीसा बारीकच वाटत होता. मला म्हणतात, तिकडे वातावरण खूप गरम असेल ना रे.? 

कधी कुठे आणि कशी गोळी किंवा आणखी कोणत्या संकटाला सामोरे जावे लागेल सांगता येत नसेल. मी म्हणालो, हो बाबा सीमेवर असच असतं. डोळ्यात तेल घालून आपले जवान जागतात. यावर त्यांचा प्रश्न होता; अचानक झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या घरच्यांची अवस्था कशी होत असेल? या प्रश्नावर मी अगदी निशब्द झालो! फोन ठेवताना बाबा म्हणाले,  बरं झालं तुम्हा तिघा भावांपैकी कोणीच सैन्याचं वेड लावून नाही घेतलं. असं काही सहन करण्याची ताकद नाही आमच्यात. मी आहे, तुम्ही मेहनत करा, आम्हाला कशाचीही कमी नाही पडणार.

आपण तरी कितीही मनाने आणि शरिराने भरभक्कम असलो तरी,  आपल्या आईवडिलांचं काळीज काही वेगळंच असतं. मुलं कितीही मोठी झाली, स्वत:च्या पायावर कितीही उभे असली तरी त्यांना आपल्या मुलांच्या प्रति काळजी ही लागुन असतेच. सैन्य म्हणजे काय? त्यांच्या जबाबदाऱ्या काय  या प्रश्नांच्या पलिकडे माझ्या बाबांचं उत्तर होतं, हे मात्र नक्की की, 'बरं झालं तुम्हा तिघा भावांपैकी कोणीच सैन्याचं वेड लावून नाही घेतलं'.

बाबांनी फोन ठेवला खरा, पण माझ्याही मनात हा विचार नक्की चमकुन गेला की, जर माझे बाबा असा विचार करत असतील तर त्यांच्या बाबांचे काय? ज्यांची मुलं खरंच बॉर्डरवर सेवा बजावत आहेत आणि त्यासाठी किती मेहनत, इच्छा घरदारांची नाती विसरून त्या शुरविरांना देशसेवा करावी लागत आहे, याचा अंदाज न घेताच युद्ध करणे, बदला घेणे, अश्या गोष्टी करणारे खरोखरच ग्रेट आहेत. 

या सगळ्या गोष्टी एका बाजुला असल्या तरी सोशल मीडियावर गाजावाजा करणाऱ्यांना युद्ध म्हणजे पोरखेळ आणि सैन्यदल म्हणजे काहीच वाटत नाही. हे ही तितकचं गंभीर.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News