जाणून घ्या! पहिला माऊंट एव्हरेस्ट कोणी चढला?; शेरपा म्हणजे काय?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 29 December 2019

एडमंड हिलरी आणि टेनझिंग नॉर्गे यांनी इसवी सन 1953 मध्ये इतिहास रचला आणि शेरपा समूह पहिल्यांदा उजेडात आला. एडमंड  हिलरी यांच्याबरोबर माऊंट एव्हरेस्टवर पाय ठेवणारी दुसरी व्यक्ती टेनझिंग नॉर्गे ही शेरपा समूहातील व्यक्ती होती.

गिर्यारोहण ही सुरुवातीला गरज होती. परंतु आत्ताच्या पिढीला गिर्यारोहण हे आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. गिर्यारोहण हे आजकालच्या पिढींच्या नसानसात भिनलं आहे म्हणून त्यांच शरीर हे इतक्या उंचीवरच्या खडतर जीवनासाठी तयार झालंय. अशीच एक व्यक्ती ज्याने पहिला माऊंट एव्हरेस्ट चढाला.

1907 साली प्रथम पाश्चात्य गिर्यारोहकांना शिरपांना आपले सामान वाहून नेण्यास सांगितले. हळूहळू तो त्यांचा व्यवसाय बनत गेला. एडमंड हिलरी आणि टेनझिंग नॉर्गे यांनी इसवी सन 1953 मध्ये इतिहास रचला आणि शेरपा समूह पहिल्यांदा उजेडात आला. एडमंड  हिलरी यांच्याबरोबर माऊंट एव्हरेस्टवर पाय ठेवणारी दुसरी व्यक्ती टेनझिंग नॉर्गे ही शेरपा समूहातील व्यक्ती होती.

त्यांनी जगातील सर्वोच्च हिमालय पर्वताच्या सर्वोच्च शिखरावर प्रथम पाय ठेवला. तेव्हापासून ते आजवर 4000 हून अधिक लोकांनी माऊंट एव्हरेस्ट सर केला आहे. शेरपा हा हिमालयाचा समानार्थी शब्द वाटावा इतकं त्यांचं नातं गहिरं आहे. हिमालय म्हणजे शेरपा आणि शेरपा म्हणजे हिमालय इतके ते एकमेकांमध्ये मिसळून गेलेत. 

शेरपा... पूर्व नेपाळमधली एक जमात. त्यांची पाळेमुळे इसवी सन 16 व्या शतकात अस्तित्त्वात असलेल्या निंजमा संस्कृतीमध्ये आढळतात. त्यांची वस्ती मुख्यत्वे एव्हरेस्ट व लोत्से या हिमालयाच्या अतिउंचपर्वतरांगांत असून इतरत्रही विशेषत: भारतातील दार्जिलिंग जिल्ह्यात (प. बंगाल) ती आढळते. ‘पूर्वेकडील रहिवासी’या अर्थाच्या शर-पा या मूळ तिबेटी शब्दांपासून शेरपा हा शब्द बनलेला आहे. शेरपांच्या अठरा कुळी असून कुळीला‘रू’ म्हणतात. त्यांत पुन्हा पोटकुळी आहेत. प्रत्येक कुळ अंतर्विवाही गट असतो. या कुळींबाहेरच्या शेरपांना खंबा म्हणतात. त्यांतही पुन्हा खड्यू व खमेंड्यू असे दोन पोटभेद आहेत.

प्रत्येक कुळीचे कुलदैवत वेगळे असून सर्व दैवतांचा अंतर्भाव ‘झिद्‌ग’ म्हणजे भूतदेवता या वर्गांत केला जातो. शेरपा समूहात मातृसत्ताक पध्दती अस्तित्त्वात आहे. या समूहात लग्न ही स्वतःच्या मर्जीने केली जातात. मात्र ही लग्न स्वतःच्या जातीत किंवा समूहात केली जात नाहीत. त्यांच्यामध्ये खादेऊ आणि खामेदेऊ असे दोन समूह आहेत. खादेऊ म्हणजे उच्च समूह असून खामेदेऊ हा कनिष्ठ समूह आहे. ते एकमेकांशी लग्न करतात. वरिष्ठ समूहाशी लग्न झाल्यास स्तर उंचावतो तर कनिष्ठ समूहाशी लग्न झाल्यास स्तर खालावतो. 

शेरपा समूहातील खास सण

शेरपा समूहातील लोक काही त्यांचे असे खास सण आवर्जून साजरे करतात. लोसार हा सण फेब्रुवारी संपताना साजरा केला जातो. तिबेटन कॅलेंडरमधील नवे वर्ष म्हणजे लोसार. तेच शेरपा आपले नववर्ष मानतात. यात पेयपान, नृत्य आणि पारंपारिक गाण्यांचा कार्यक्रम होतो. शेरपा समूहातील लोक काही त्यांचे असे खास सण आवर्जून साजरे करतात. लोसार हा सण फेब्रुवारी संपताना साजरा केला जातो. तिबेटन कॅलेंडरमधील नवे वर्ष म्हणजे लोसार. तेच शेरपा आपले नववर्ष मानतात. यात पेयपान, नृत्य आणि पारंपारिक गाण्यांचा कार्यक्रम होतो.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News