‘हे’ देश कोरोनाच्या उद्रेकाला जबाबदार नियमांचे पालन न केल्याचा डब्ल्यूएचओचा दावा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 July 2020
  • कोरोना संसर्गाने अवघ्या जगात थैमान घातले आहे.
  • अत्यंत वेगाने कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसते.
  • त्यातच जागतिक आरोग्य संघटनेकडून एक मोठे विधान करण्यात आले आहे.

मुंबई :- कोरोना संसर्गाने अवघ्या जगात थैमान घातले आहे. अत्यंत वेगाने कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसते. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेकडून एक मोठे विधान करण्यात आले आहे. जगभरात वाढत्या संक्रमणाला अमेरिका तसेच आशियातील काही देश जबाबदार असल्याचे ब्ल्यूएचओचे अध्यक्ष टेड्रॉस ग्रेब्रेयसिस यांनी म्हटले आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी डब्ल्यूएचओने नियमावली आखून दिली होती, मात्र नियमावलीचा भंग करून काहींनी बेजबाबदारपणाचा कळस गाठल्याचे दिसते. त्यामुळे संक्रमणाचा आलेख वेगाने वाढत असल्याचे ट्रेड्रॉस यांनी म्हटले आहे.
कोरोना संसर्गाने दगावण्याचे सर्वाधिक प्रमाण हे अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेत आतापर्यंत सव्वा लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेखालोखाल ब्राझील देशात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये आतापर्यंत ७५ हजाराहून अधिक मृत्यू झाले आहेत.

जगभरात कोरोना संसर्ग पसरू लागल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने या संसर्गापासून खबरदारी म्हणून नियमावली जाहीर केली. त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे आवाहन ही त्यांनी केले. त्यात त्यांनी सर्वांनी बाहेर फिरतांना मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, तसेच वारंवार हात धुऊन सॅनिटाईज करणे आवश्‍यक असल्याचे सांगितले. जगभरातील काही देशांनी मात्र डब्ल्यूएचओने जाहीर केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. त्यासाठी अमेरिका तसेच आशियातील काही देशांना जबाबदार धरले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क आवश्‍यक असल्याचे स्वीकारण्यास नकार दिला. अमेरिकेत बाधितांची संख्या वाढल्यानंतर तसेच मृत्यूने थैमान घातल्यानंतर मात्र ट्रम्प यांनी मास्क घालण्यास तयारी दर्शवली, इतकेच नाही तर त्यांनी इतर लोकांनाही मास्क घालण्यास प्रेरित केले.

ब्राझीलच्या अध्यक्षांवरही टीका

 अमेरिकेने डब्ल्यूएचओ संघटनेवर अनेक आरोप करत आपले नात तोडले. त्यानंतर डब्ल्यूएचओने देखील अमेरिकेवर अनेक आरोप केले. आता तर टेड्रॉस यांनी अमेरिकेतील वाढत्या कोरोना संक्रमणाला ट्रम्प यांना जबाबदार धरले आहे. इतकेच नाही तर ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी देखील संक्रमणापासून वाचण्यासाठी मास्क घालण्यास तसेच लॉकडाऊनला विरोध केला. त्यासाठी डब्ल्यूएचओने ब्राझीलचे राष्ट्रपती जायरे बोल्सोनारो यांना जबाबदार धरले आहे. डब्ल्यूएचओने घालून दिलेल्या नियमांचे या देशांनी पालन न केल्यानेच कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्याचे टेड्रॉस यांनी म्हटले आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News