गुटखा खाताना पत्नीनं हटकलं; मग पतीनं केलं असं की...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 August 2020

गुटखा खाताना पत्नीनं हटकलं; मग पतीनं केलं असं की...

गुटखा खाताना पत्नीनं हटकलं; मग पतीनं केलं असं की...

उत्तर प्रदेश - अनेकांना लग्नाच्या आगोदर असंख्य व्यसनं असतात, पण लग्न झाल्यानंतर पती आणि पत्नीमध्ये त्या व्यसनामुळे भांडणं व्हायला सुरूवात होते. असाचं प्रकार घडलाय उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर परिसरात, गुटखा खाताना रोखणा-या पत्नीला पतीने पिस्तूलातून गोळ्या घातल्या आहेत. पत्नीची प्रकृती गंभीर असून महिलेच्या वडिलांनी हस्तिनापूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे दोघांचं लग्न सहा महिन्यापुर्वी झालं होतं.

हस्तिनापूरच्या लालसिंह नगरमध्ये राहणाऱ्या रणवीर सिंह यांच्या मुलीचं सहा महिन्यापुर्वी लोकेश याच्याशी लग्न झालं होतं. लोकेशला दारू आणि गुटख्याचं व्यसन होतं. सहा महिन्यात काजलला लोकेशची व्यसनं माहित पडली होती. त्यामुळे ती लोकेशला वारंवार गुटखा खाण्यापासून रोकत होती. पण लोकेश ऐकत नसल्यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडायला सुरूवात झाली. लोकेशचं व्यसन सुटाव अशी काजलची अपेक्षा होती. त्यामुळे तो गुटखा खाताना दिसला की ती त्याला हटकत असे.

लोकेश शुक्रवारी दुपारी गुटखा खाऊन घरी आला. त्याला पाहून पत्नी काजलला राग अनावर झाला, त्यानंतर दोघात भांडणाला सुरूवात झाली. रागात असलेल्या लोकेशने पत्नीवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे. घाबरलेल्या कुटुंबियांनी काजलला तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल केले. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. काजलच्या वडिलांनी लोकेशच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी लोकेशला ताब्यात घेतले असल्याचे हस्तिनापूर पोलीस ठाण्याचे प्रमुख धर्मेंद्र सिंह यांनी सांगितले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News