कोणता आहे तुमच्या लिपस्टिकच्या शेड?

अर्चना राणे-बागवान
Tuesday, 19 March 2019

एखादा छान पेहराव केला, की आपली पर्सनॅलिटी आकर्षक दिसेल असा तुमचा समज असेल तर तो ठाम चुकीचा आहे. पेहरावाबरोबरच तुमचा मेकअप आणि त्यातही तुमची लिपस्टिक शेड महत्त्वाची ठरते.

खरे तर मेकअपला फायनल टच; चार चाँद लावण्याचे काम लिपस्टिक करत असते. बऱ्याचदा आपण लिपस्टिककडे, तिच्या शेड्‌सकडे दुर्लक्ष करतो. आपल्या ठेवणीतली एखादी डार्क शेडची (रेड, ब्राऊन) लिपस्टिक लावून मोकळे होतो. गेल्या वर्षी मॅट लिपस्टिक शेडसची चलती होती. ती अजूनही कायम आहे. मात्र ग्लॉसी शेड्‌सदेखील यंदा ट्रेंडमध्ये असतील. 

नॉन स्टीकी टेक्‍श्चरमधील शिमरिंग ग्लॉस आणि कोरल लिपस्टिक यंदा ओठांवर राज्य करेल. ज्यांना डार्क लिपस्टिक शेड्‌स आवडत नसतील त्यांच्याकरता न्यूडचा पर्याय आहेच. 

लग्न, समारंभासाठी बऱ्याच स्त्रिया रेड हॉट शेड वापरण्यालाच अधिक पसंती देतात. या वर्षी हॉट शेड थोडी बाजूला सारून डोळ्यांना बोल्ड लुक देत ओठांना ग्लॉसी टच दिल्यास थोडं हटके दिसायला मदत होईल. 

उन्हाळ्यात कुल पिंक शेड वापरणे कधीही योग्य. हॅंग आऊटसाठी किंवा एखाद्या छोटेखानी समारंभात ही शेड वापरता येते. हल्ली लीक्विड लिपस्टिक वापरण्याची क्रेझही मुलींमध्ये दिसते. मात्र ही वापरताना काळजी घ्यावी लागते. ही लिपस्टिक घाईघाईत लावून चालत नाही. यात ग्लॉसी, न्यूडचे चांगले पर्याय आहेत. डीप ब्राऊन, मिल्क चॉकलेट ब्राऊन, कॉफी, ब्राऊन आणि पिंक मिक्‍श्चर लिपस्टिक्स मस्त दिसतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News