अभ्यासक्रमात सेक्स एज्युकेशनचा समावेश कोणत्या वर्गापासून असावा?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • शिक्षण व्यवस्थेच्या गलथान कारभारामुळे सेक्य एज्युकेशन सारखा महत्त्वाचा विषय मागे राहतो. आधुनिक काळात सेक्स एज्युकेशनची नितांत गरज आहे.

मुंबई : मुला- मुलींचे वय वाढते तसे शरिरात काही महत्वपुर्ण बदल होतात. या बदलाची महिती बहुसंख्य तरुणाईला नसते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. काही वेळा तरुणाई विकृतीकडे वळते. अशा परिस्थितीत सेक्स एज्युकेशनची अत्यंत गरज असते. मात्र शिक्षण व्यवस्थेच्या गलथान कारभारामुळे सेक्य एज्युकेशन सारखा महत्त्वाचा विषय मागे राहतो. आधुनिक काळात सेक्स एज्युकेशनची नितांत गरज आहे. 'अभ्यासक्रमात सेक्स एज्युकेशनचा समावेश कोणत्या वर्गापासून असावा? या विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपमध्ये आज मनोसोक्त चर्चा करण्यात आली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

अभ्यास क्रमात सेक्स एज्यूकेशन समावेश प्राथमिक शाळा झाल्यावर माध्यमिक शाळे पासून करावे तोपर्यंत मुलांना त्या बद्दल कल्पना यायला सुरुवात होते. कशोर वयिन मुलांमध्ये मुलींमधे वयानुसार शारीरिक बदल होतात. आणि ह्या बदला बद्दल त्यांना आधीच महिती असंन गरजेचं असत.  त्यांची सर्व जाणून घेण्याची उत्सुकता पण महत्वाची असते.  नाहीतर ते ह्या गोष्टी आपले मित्रामध्ये चर्चा ,इंटरनेट  वरून मिळवतात. यामध्ये त्यांची दिशाभूल होते. ते वाईट गोष्टी कडे आकर्षित होतात. जसे की घाणेरडे जोक्स पसरवणे, एकादी मुलगी जात असेल तर तिला घाणेरडी कममेन्ट पास करणे, आणि बऱ्याच वाईट प्रवृत्ती कडे आकर्षित होतात. त्यामुळे शारीरिक बदलावं हे नैसर्गिक आहे त्यांना कळणं गरजेचं आहे. ती एक कॉमन आहे त्यात काही नवीन नाही त्यांना सांगायला हवं.
- प्रतिक भालेराव

मला वाटते की, मुलांना त्यांच्या वयानुसार लैंगिक शिक्षण दिले पाहिजे म्हणजेच वयाच्या 5-6 वर्षांच्या नंतर त्यांच्या वयाचा विचार करून प्रत्येक घरात पालकांनी मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती दिली पाहिजे. कारण मुले मोठे होत असताना अनेक प्रश्ण मुलांना पडत असतात,त्यामुळे योग्य रित्या मुलांना सेक्स बद्दल बोलले पाहिजे. यामुळे बलात्काराचे प्रमाण कमी होईल, स्त्रीयांचा लोक आदर करतील याकडे अश्या अनेक गोष्टीकडे लक्ष देऊन मुलांना लैंगिक शिक्षण दिले जावे. ग्रामीण भागात लोक लाजतात भितात, पन असे न करता मुलांना सेक्स एज्युकेशन दिले पाहिजे. त्यामुळे मुलांमधे होणारा बदल त्यांच्या लक्षात येईल. आणि युवक चांगल्या दिशेने वाटचाल करतील. अलीकडे युवा पिढीमध्ये व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली समलैंगिक संबंध, बलात्कार, एड्स, मुलींची छेडछाड इत्यादी प्रकारचा स्वैराचार वाढताना दिसून येत असून त्यांच्या संख्येतही मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे.  त्यामुळे अशा समस्यांना तोंड देण्यासाठी युवक-युवतींमध्ये योग्य ती सामाजिक जाणीव तयार करणे, वैज्ञानिक मनोवृत्ती विकसित करणे इत्यादींकरिता लैंगिक शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे. लैंगिक शिक्षणाच्या माध्यमातून लैंगिकतेकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याची मनोवृत्ती तयार झाली, तर कामवासनेच्या बाबतीत उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी निश्चितच वातावरणनिर्मिती होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक शाळेत, घरी लैंगिक शिक्षणावर चर्चा झाली पाहिजे.
- सुरज कांबळे

शालेय अभ्यासक्रमात सेक्स एज्युकेशन विषय हा खूप कमी प्रमाणात शिकवला जातो. विज्ञान विषयात केवळ  मानवी ज्ञानेंद्रिय या विषयी माहिती मुलांना दिली जाते.तसेच पालक देखील आपल्या मुलामुलींन सोबत कधी वेळ देऊन या लैगिंक शिक्षणा विषयी बोलत नाही.कारण सेक्स विषयावर बोलणे म्हणजे लज्यास्पद समजलें जाते.पण आज मुलांना लैंगिक शिक्षनाची खूप आवश्यकता आहे. मानवी शरीरात बदल होणे हे नैसर्गिक आहे.हळू हळू जसे मुलांच्या शरीरात बदल होण्यास सुरुवात होते तस तसे त्याला मुलगा व मुलगी यातील फरक समजून जातो.थोडक्यात मुलांना वयानुसार लैंगिक बुद्धी विकसित होते.परंतु त्यांना योग्य माहिती नसल्यामुळे काही मुले मनातील भावनांना नियंत्रित करू शकत नाही. सेक्स एज्युकेशन चा समावेश वर्ग 3 ते 5 तील लहान मुलांना अगोदर good touch आणि bad touch या विषयी माहिती दिली पाहजे.व इयत्ता 8 वि तील मुलांना गुप्तरोग,एड्स, बलात्कार मुलींची छेड ,व कमी वयात गर्भधारणा व त्याचे विपरीत परिणाम  या विषयी योग्य माहिती मिळाली पाहिजे. तेव्हा मुलांची मानसिकता बदलून  सामाजिक बदल होण्यास मदत होईल.देशातील प्रत्येक व्यक्ती  महिला व पुरुषाचा सन्मान,आदर करेल व बलात्कारासारखे घृणा-स्पद प्रकरण घडणार नाहीत.
- सुनिल कोटकर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News