संविधान गेले कुठे?

माधव जाधव
Thursday, 6 June 2019

सगळीच माणसे ही
आता ऐशखोर झाली 
पृथ्वीस पेलणारे
श्रम हात  गेले कुठे ?

माणूस माणसाचा
कातील झाःला आहे
माणूसकी पेरणारे
माणसं ती गेली कुठे ?

द्वेष मत्सराचा आता
हल्लकल्लोळ आहे !
माया ममता देणारी
हृदय ती गेली कुठे ?

सगळीच माणसे ही
आता ऐशखोर झाली 
पृथ्वीस पेलणारे
श्रम हात  गेले कुठे ?

अज्ञान अंधःकाराने
सदा घातपात केला
ज्ञानदीप पेटवणारी
ज्योत ती गेली कुठे ?

स्वत्वास स्थापतांना
संवेदना शुन्य जो तो
प्रज्ञा-शील-करुणेचे
 निळे आभाळ गेले कुठे ?

जंगलात माणसांच्या
जात धर्म पेट घेतो
सर्वधर्म समभावाचे
संविधान गेले कुठे ?

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News