कुठे निघाली कॉलेज कुमारी?

मारोती कसाब
Sunday, 2 June 2019

एका हाताने पर्स दाबून
दुसरा हात हलवत
जवळ जवळ धावतच
कुठं निघाल्यात त्या.?

पायपोळ झालेल्या भर दुपारी उन्हात तोंडं बांधून
कुठं जात असतील या मुली..?

टाॅप- स्कर्टातल्या साडीवाल्या
सलवार कमीजवाल्या
अडाणी काही जास्त शिकलेल्या

एका हाताने पर्स दाबून
दुसरा हात हलवत
जवळ जवळ धावतच
कुठं निघाल्यात त्या.?

मी पाहतो वाट परतण्याची त्यांच्या
बापाच्या काळजीने
तर
एकही दिसत नाही
आल्या पावली
गेल्या वाटेने परतताना !

दुसऱ्याच वाटेने
परतत असतील का
त्या  सरळ नीट
आपापल्या घरी ?

भर उन्हात  तोंडं बांधून
घाईघाईने खरंच
कुठं जात असतील या मुली..??

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News