कुठवर सहन करायचं?

शुभांगी पवार 
Monday, 9 September 2019

कुठवर सहन करायचं?
अस दुय्यमत्वाच जीणं
ओढून अबलेच कळसूत्रीपणाच लेणं,
कुणालाच नसत "तीचं" देणंघेणं.

कुठवर सहन करायचं?'
अस दास्यत्वातलं जगणं
हास्याचे मुखवटे चढवून कृत्रीमपणे वागणं,
आपणच राहायचं आपल्यातच मग्न.

कुठवर सहन करायचं?
माझ्यावरचा तुझा पुरुषी अंकुश
तरीही राहायचं मी खुश,
एवढ्यावरही तुझा "स्व" सदा नाखूश.

कुठवर सहन करायचं?
अस दुय्यमत्वाच जीणं
ओढून अबलेच कळसूत्रीपणाच लेणं,
कुणालाच नसत "तीचं" देणंघेणं.

कुठवर सहन करायचं?
अस तीळ-तीळ मरणं
हळुवार शब्दप्रेमासाठी झुरणं,
हरक्षण दुसऱ्यासाठी हरणं.

कुठवर सहन करायचं?
माझी मीच ओळख पुसणं
माझ्यातच मी नसणं,
उगाचच व्यर्थपणे जगणं??"

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News