बॉयफ्रेन्डची आठवण आल्यावर एकट्या असताना मुली हे करतात...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 3 April 2019

मुलींना समजणे कठीणच नाही तर अनेकदा अशक्य असते. त्यांच्या मनात कधी काय सुरु असते याचा थांगपत्ता लागणे जवळजवळ अशक्यच असते. तसेच बॉयफ्रेंडपासून दूर असल्यावर त्या खूप जास्त मिस करतात. अशावेळी घरात एकट्या असताना मुली नेमक्या काय करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते.  चला जाणून घेऊया मुली एकट्या असल्या की काय करतात.

मुलींना समजणे कठीणच नाही तर अनेकदा अशक्य असते. त्यांच्या मनात कधी काय सुरु असते याचा थांगपत्ता लागणे जवळजवळ अशक्यच असते. तसेच बॉयफ्रेंडपासून दूर असल्यावर त्या खूप जास्त मिस करतात. अशावेळी घरात एकट्या असताना मुली नेमक्या काय करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते.  चला जाणून घेऊया मुली एकट्या असल्या की काय करतात.

बॉयफ्रेन्डचा फोटो बघतात
जास्त मुली जेव्हा आपल्या बॉयफ्रेन्डपासून लांब असतात आणि अशात तिला बॉयफ्रेन्डची आठवण आली की, त्या बॉयफ्रेन्डचा फोटो बघतात. दोघांनी सोबत काढलेले अनेक फोटो सतत मुली बघत असतात.

सोशल मिडिया अकाऊंट चेक करणे
कित्येक मुली जेव्हा बॉयफ्रेन्डसोबत नसतात तेव्हा जासूस बनतात. त्या आपल्या पार्टनरचं फेसबुक, ट्विटर अकाऊंट चेक करतात. त्या हे तपासून पाहत असतात की, बॉयफ्रेन्ड एखाद्या मुलीचा फोटो लाईक किंवा त्या फोटोवर कमेंट तर केली नाही ना. यासोबत त्या फ्रेन्डलिस्टही चेक करतात.

फोन करणे
मुली जेव्हा त्यांच्या बॉयफ्रेन्डला मिस करतात तेव्हा त्या बॉयफ्रेन्डला अनेकदा फोन करतात. फोन करून त्या तासंतास त्याच्याशी बोलत असतात.

सेल्फी काढतात 
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेल्फी. मुलींना सेल्फीची क्रेझ असते. यावेळी घरात एकट्या असल्या की वेगवेगळ्या पोझमध्ये मुलींना सेल्फी काढायला आवडते. सेल्फी काढून आपल्या बॉयफ्रेंडला पाठवतात.

गाणी ऎकणे
मुली बॉयफ्रेन्डपासून दूर असल्या की, रोमॅंटिक गाणी ऎकतात. अशा गाण्यांमध्ये त्या स्वत:ला इमॅजिन करतात. त्या गाण्यांचा फिल घेतात.

आरशात न्याहाळत बसतात 
आरसा हा मुलींचा आवडता मित्र असतो. त्यामुळे घरात एकट्या असताना तासानतास आरशात न्याहाळत बसण्याची सवय अनेक मुलींना असते. 

फ्यूचर प्लॅनिंग
मुली अशावेळी लग्न आणि पुढील जीवनाबद्द्लही विचार करतात. ते सोबत कसे राहतील, सासरच्या लोकांसोबत कसे जमेल, या सर्व गोष्टींचा विचार काही मुली करत असतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News