#NationalYouthDay जेव्हा कमी वयात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळते आणि...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 12 January 2020

अल्प परिचय...
तेजस संगिता धनंजय पाटील
मा. यिन मुख्यमंत्री महाराष्ट्र 
संचालक, शेतकरी खरेदी विक्री संघ, यावल जि.जळगाव.
संस्थापक अध्यक्ष - आधार फौन्डेशन, शिरसाड ता.यावल
अध्यक्ष - स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन जळगांव
संस्थापक सचिव - कै. सौ. कमलाबाई एकनाथराव पाटील सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, शिरसाड 
मोबा. नंबर 9657737200
ई - मेल tejaspatil2094@gmail.Com

नमस्कार, 
समाजकार्याचा वारसा हा मला माझ्या घरातूनच मिळाला होता. कारण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, "जनसेवा हीच ईश्वरसेवा" यांसारख्या शिकवणीचा वारसा परंमपरेने मला मिळाला त्यामुळे लोकांच्या सुखा-दुःखात, अडी-अडचणीमंध्ये  सहभाग घेऊन आपल्याकडून होईल तेवढी मदत करणे व अडचणीतून मार्ग काढणे हा स्वभावधर्म बनला जणू!

आजोबांनी 35 वर्षे सालदारकी करून वडीलांना व काकांना शिकवलेले आहे. आई वडीलांनी गरिबी बघीतली होती, त्यातून दोघांनी मात करत शिक्षकी पेशा निवडला होता. त्यामुळे त्या कष्टाची व गरिबीची जाणीव घरातच शिकायला मिळाल्यामुळे सामाजीकतेची शिस्त  अंगीकृत झालेली होती.  त्यातच इंजिनिअरिंगला नाशिक येथे सपकाळ नॉलेज हला माझा नंबर लागला. येथे ऍडमिशन घेतली. कॉलेज हॉस्टेलला पण राहण्याची सोय झाली. आधीपासूनच समाजसेवेचे व्रत अंगीकृत होते. त्यामुळे 20 जून 2014 ला माझ्या वाढदिवशी आम्ही दोघे जुळे भावांनी आई-वडीलांना एकच मागीतले ते म्हणजे आपण गावातील गोर-गरीब मुलांसाठी वाचनालय काढुयात. परिवाराने यावर संमती दर्शवली. 

दरवर्षी किणगाव ते मुक्ताई पायी दिंडी आमच्या शिरसाड या गावातून जात असे.  त्या दिंडीतील सर्व लोकांना आमच्या घरी जेवण असे. आम्ही दोघे भावांनी  ठरवले की, याच दिवशी वाचनालयाचे उद्घाटन करावे. जळगाव जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार आदरयणीय स्व. विद्याधर पानट सर व दिंडीतील माय-माऊली यांच्या हस्ते या वाचनालयाचे उदघाटन 12 फेब्रुवारी 2015 रोजी या सर्व वारकऱ्यांसमक्ष स्वखर्चाने वाचनालयाची सुरुवात झाली. ती आजतागायत  यशस्वीरित्या सुरू आहे. आपल्या गावातील गरीब मित्र मैत्रिणींना हक्काचे  व्यासपीठ असावे, यासाठी या वाचनालयाची स्थापना करून सामाजिक सेवेमध्ये पहिले पाऊल मी ठेवले होते. ज्याचा पिंड जो असतो त्याला तो त्या गोष्टीसाठी नेहमीच प्रवृत्त करतो आणि तेच माझ्यासोबत झाले. सपकाळ नॉलेज हबला आल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न डोळ्यासमोर उभे राहीले. कोणी पुढाकार घ्यायला तयार नाही. त्यातच मी  उडी घेतली आणि विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमधील काही प्रश्नांवर मी आवाज
 उठवण्यास सुरुवात केली.

त्या दिवशी माझी भेट एका अविस्मरणीय व्यक्तीसोबत झाली, ते म्हणजे आमच्या सपकाळ कॉलेजचे चेअरमन डॉ. रवीद्रं सपकाळ सर. भेटण्या आधी सर्व लोकांनी माझ्या मनात दहशत निर्माण केली की सपकाळ सर खूप शिस्तप्रिय व संतापी आहेत. असतस खूप काही सांगितले, पण जेव्हा मी भेटलो त्यांच्यासमोर आमच्या समस्या सांगितल्या त्यानंतर लगेच त्यांनी विद्यार्थी हिताय निर्णय घेऊन आम्हाला मार्गदर्शन केले. त्या दिवसापासून मी त्यांच्या कर्तृत्वाचा आणि वेगळ्या नेतृत्व शैलीचा चाहता झालो. त्यानंतर विविध विद्यार्थीही त्या  कार्यक्रम व प्रश्नासंदर्भात भेटी होऊ लागल्या. 

कॉलेजमध्ये एक वेगळी विद्यार्थ्यांसाठी झटणारा, वेळोवेळी मदत करणारा कैवारी म्हणून माझी ओळख निर्माण झाली होती. पुढे चालून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विभागीय मंत्री म्हणून जबबदारी  आली. त्यावेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन आंदोलने केली. सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर केले. नाशिकमधील त्याचवेळी आलेला कुंभमेळा यामध्ये खूप लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली, त्यातून ओळखी झाल्या. त्याचवेळी सकाळ माध्यम समूहाचा एक तरूणाईसाठीचा उपक्रम म्हणजेच यिन हा आमच्यामध्ये आला. जेव्हा सपकाळ सर आणि प्राचार्य सरांनी मला बोलवून घेतले व याची माहिती दिली आणि सांगितले की तुला आपला कॉलेज प्रतिनिधी  म्हणून निवड करायची आहे. तू ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार याची खात्री आहे. त्यानुसार माझी यिनच्या कॉलेज प्रतिनीधीपदी निवड करण्यात आली. 

सकाळ माध्यम समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय अभिजीत पवार सर यांनी  महाराष्ट्रातील तरुणाईला हक्काचे व्यासपीठ मिळावे या भावनेतून यंग  इन्स्पिरेटर्स नेटवर्क अर्थात यिन या युथ फोरमची स्थापना केली. त्या अंतर्गत तरुणाईचे मंत्रिमंडळ ही संकल्पना कळली. YIN हे महाराष्ट्रातील तरुणाईच्या सुप्त कला गुणांना वाव देणारे एकमेव हक्काचे व्यासपीठ आहे हे कळून आले होते.  "यिन नाशिक जिल्हाध्यक्ष 2017" ची निवडणूक होती, त्यात माझी ग्रामीण  जिल्हाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड  झाली. माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आली आहे, हे मला कळून चुकले होतो. त्यातच  यिन मंत्रिमंडळचा कार्यक्रमासाठी मुंबईला गेलो. तेथे मी आदरणीय अभिजीत  पवार सरांना ऐकण्याचा आणि भेटण्याचा योग आला. त्या दिवशी कळालं की आजही या कलियुगात माणसासाठी माणुसकीने जगणारी व काम करणारी लोकं आहेत. 

अभिजीत  पवार सरांनी आमच्या तरुणाईला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले याची जाणीव तथा संपुर्ण माहिती त्या कार्यक्रमात झाली. यिन 2017 च्या मंत्रीमंडळात मला  अर्थमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली होती. त्या दिवशी मी आनंदी होतो. सकाळ पेपर मध्ये माझे नाव आले होते. पद घेतल्यानंतर पहिल्यांदाच गावाकडे आलो.  गावात मित्र परिवाराने ढोल-ताशे मिरवणूक काढून स्वागत  केले. सत्कार झाले. काही दिवसांनी मी नाशिक, जी माझी कर्मभूमी झाली होती, तिकडे जाण्यास निघालो. जाण्याआधी आई-वडील व संपूर्ण परिवाराने एक सांगितले होते, की तेजस लक्षात ठेव, या सत्काराची हवा डोक्यात जाऊ देऊ नको आणि आपल्याला या समाजाची सेवा करायची आहे, ते व्रत सोडू नको. हे ऐकून मी नाशिकला आलो, कॉलेजला आदरणीय सपकाळ सरांनी सत्कार केला, सर्व विद्यार्थ्यांनी जंगी स्वागत केले. त्यानंतर पुन्हा नवीन जबाबदारी नवीन कामाला सुरुवात केली. अर्थमंत्री  असताना शिष्यवृत्ती संदर्भाचे विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावले. तसेच  या काळात पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभाराची अधीकाऱ्यांना जाणीव करून  दिली. नाशिकमधील विविध कॉलेजमध्ये यिन संवाद नावाचा मोठे कार्यक्रम घेतले. ज्यात IAS-IPS अधीकाऱ्यांसोबत विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणला. 
त्यांनतर मे महिन्यात "चला घडू या देशासाठी" या तीन दिवसीय उन्हाळी शिबीराची जबाबदारी नाशिक यिन जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्यावर आली. त्यांचे  आयोजन यिन आणि प्रायोजक म्हणून आमचे सपकाळ नॉलेज हबने घेतले. या कार्यक्रमात  खऱ्या अर्थाने माझी प्रतिष्ठा प्रणाला लागली. 1000 मुलांचे तीन दिवसीय नियोजन, यात माझ्या सर्व टीमने खूप मेहनत घेऊन एक आगळा वेगळा कार्यक्रम  संपूर्ण महाराष्ट्रातील इतर कार्यक्रमापेक्षा जास्त यशस्वी करून दाखयवला.यामध्ये खूप मोठ्या मान्यवरांना भेटण्याचा व अनुभवन्याचा योग आला. त्यानंतर आरोग्यविषयक सेवा पण त्या काळात मोठ्या प्रमाणावर मी केली. एक  तनिष्का भगिनीचा मुलगा ज्याला ब्लड कॅन्सर झाला होता. त्या मुलाला संदीप  काळे सरांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून दिला आणि  जेव्हा तो चेक द्यायला गेलो तेव्हा त्या मुलाच्या आई-वडीलांच्या चेहऱ्यावरचे आनंदअश्रू बघून   मनस्वी आनंद झाला. तेव्हा खऱ्या अर्थाने आपण अर्थमंत्री पदाची जबाबदारी  पार पाडण्यात यशस्वी झालो याची जाणीव झाली. त्याच काळात यिन अर्थमंत्री  म्हणून जळगांव, औरंगाबाद, जालना, लातूर या जील्ह्याचा दौरा करण्याचा योगसुद्धा आला. या एका वर्षात खूप काही शिकलो होतो. खूप काही कामे केली होती, त्याच्याच जोरावर मी पुन्हा एकदा कॉलेज यिन प्रतिनीधी आणि ग्रामीण यिन नाशिक जिल्हाध्यक्ष पदी दुसऱ्यांदा वर्णी लागली. आता लक्ष होते ते यिन मुख्यमंत्री पदावर!

म्हणतात न आपण फक्त आपले काम प्रामाणिकपणे करावे यश आपल्याला हमखास मिळते. याची प्रचीती मला यिन मुख्यमंत्री 2018 च्या निवडणुकीमध्ये आली. चुरशीच्या लढतीत चांगल्या मताधीक्याने यिन मुख्यमंत्री म्हणून निवडून आलो. विधानपरिषदेचे सभापती आदरणीय रामराजे निंबाळकर साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून मला शपथ दिली. साम टीव्ही वर ते सर्व चालु होते. दुसऱ्या दिवशी sakal times व सकाळ पेपर ला पहिल्या पानावर फोटो व बातम्या आल्या. माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा तो क्षण होता. गावाकडे आलो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर celebration झाले. कॉलेज ला पण खूप जोरात स्वागत झाले. पण मला परिवाराने सांगितलेले लक्षात होते की "पाय जमिनीवर ठेव" त्यामुळेच मी नवीन टीम सोबत नवीन उमेदीने कामाची सुरुवात केली. 

पहिलाच संपूर्ण महाराष्ट्रात 31 डीसेंबरला "दारू ऐवजी दूध प्या" हा उपक्रम खूप यशस्वी झाला. महाराष्ट्रातील विविध कॉलेजवर तसेच काही शहरातील मुख्य चौकात दूध गरम करून वाटण्यात आले. मला माहित होते की  संपूर्ण टीमला एका-एका ठकाणी बोलावून नियोजन केले पाहिजे. त्यानुसार मी नाशिकला संपूर्ण मंत्रिमंडळाचे पहिले अधिवेशन 16 व 17 जानेवारीला GPFarm येथे आयोजित केले. या अधिवेशनात पुनीत बाली सर, श्रीराम पवार सर,अभीनंदन थोरात सर, श्रीमंत माने सर, विजय बुवा सर, संदीप काळे सर  इ मान्मवरांनी मार्गदर्शन केले. त्या अधिवेशनात आपल्या मंत्रिमंडळाचे वर्षाभरातील कामाचे नियोजन करून घेतले. त्या अधिवेशनात सर्व टीमच्या मनातील विविध पॉईंट्सवर चर्चा करण्यात  आली. त्यानुसार 26 जानेवारी ला प्रजासत्ताकदिनी "सेल्पी विथ पोलीस" हा पोलिसांच्या सन्मानसाठी कार्यकम घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रात तो खूप यशस्वी झाला. 

मराठी दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात  घेण्यात आले. त्यानंतर rose with civiliance , केक ऐवजी नेक काम, झाडे लावा झाडे जगवा, वोटिंग अवेअरनेस प्रोग्राम, मायेची ऊब, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, यिन संवाद, यिन कट्टा, जॉब फेअर, एन. एस. एस. टीम सोबत गप्पा-गोष्टी, technical proggrame, interview technic इ. खूप innovativeproggrame माझ्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रात घेतले. 

मे-जुनमध्ये समर युथ समिटचेसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात 12 जिल्ह्यामध्ये आयोजन यशस्वी केले. तसेच 100च्या वर मुलांना जॉब मिळवून दिलाय. काही मुलांच्या प्रोजेक्टसाठी योग्य मार्गदर्शक मिळवून दिले. अनाथ आश्रम व वृद्धाश्रमातील लोकांसोबत आपल्या तरुणाईचे संबंध वृद्धिंगत केले आपण विविध सन त्या अनाथ मुलांसोबत आणि वृद्ध आजी-आजोबांसोबत साजरे करण्यात आले. मी यिनचा पहिला मुख्यमंत्री आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. विविध कॉलेजला भेटू देऊन तरुणाईच्या समस्या जाणून घेतल्या. प्रत्येक जिल्ह्यातील यिन टीमला भेटून त्यांचा आत्मविश्वास वाढवला आणि त्यांच्या मनातील कल्पना जाणून घेतल्या. त्यांना मार्ग्दर्शन करण्याचा बहुमान मिळाला. यातून मला खूप मोठी जीवनाची शिदोरी यिन मधून मिळाली. आज संपूर्ण महाराष्ट्रात जीवाला जीव देणारी मंडळी मला मिळाली जी, आयुष्यभर माझा परिवार झालाय.तसेच दौऱ्यामध्ये मला संपूर्ण महाराष्ट्राचा सामाजिक व राजकीय जवळून अभ्यास करण्याचा योग आला. आजचा जो युवक भरकटत जात आहे. त्याला योग्य दिशा देण्याचे काम केले आहे.

यिनमध्ये जो आला त्याचे  carrier नक्कीच तयार होते. यिनने मला खूप काही दिले आहे. तेजस पाटीलमध्ये गुण होते पण त्याला महाराष्ट्र स्तरावर कमी वयात काम करण्याची संधी यिननेमला दिली. यिनमध्ये काम करत असताना मला जाणीव झाली की परिवर्तन करण्यासाठी आपले चांगले विचार व काम करण्याची जिद्द चिकाटी महत्वाची असते. 

महाराष्ट्रातील पहिले आजी-आजोबा संमेलनाचा प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. अशाप्रकारे विविध कार्यक्रमला जाण्याचे योग आले. यिन मुख्यमंत्री असताना माझ्या नावावर एक अजून मोठा मानाचा तुरा रोवला गेला तो म्हणजे महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात सक्रीय
 राजकारणात सर्वात कमी वयाचा संचालक म्हणून निवडून येण्याचा बहुमान
 मिळाला. आज जरी मावळता यिन मुख्यमंत्री असलो तरी आजीवन यिन सदस्य राहीन कारण या संपूर्ण तरुणाईमुळेच मी यावल तालुका शेतकी खरेदी विक्री संघात निवडून आलोय.

हे सर्व करत असताना खूप वाईट अनुभव कमी वयात अनुभवयास मला मिळाले. आपली प्रगती सहन होत नाही म्हणून विरोधकांच्या कारवायांना सामोरे गेलो. काही लोकांनी जीवनातून मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्रातील संपूर्ण तरुणाईच्या शुभेच्छा आणि निस्वार्थ समाजसेवेचा आशीर्वाद आहे म्हणूनच या सर्वावर मात  करून आज यशस्वी आहे.

पुढे गावातील तरुणांना एकत्र करत आधार फाऊंडेशनची स्थापना केली. त्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले. ते पूर्ण केले. यामुळे सर्व
तरुणाईला आपल्या कर्तव्याची जाणीव होत आहे. मागच्या आठवड्यात स्टूडेंट ओलंपिक असोसिएशन जळगावचे अध्यक्ष पदी विरजमान होण्याचा मान मिळाला. पद स्वीकारत असताना मनाशी निश्चय केला की, ग्रामीण भागातील जास्तीत जास्त खेळाडूंना आपण वर नेण्याचा प्रयत्न करू. त्यानुसार नियोजन सुरू केले आहे.

अशाप्रकारे महाराष्ट्रातील सर्व समाजातील घटकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही सर्व करत आहोत. अजून विविध सामाजिक कामामध्ये मला खूप काही करायचे आहे. महाराष्ट्रातील एकही मुलगा व्यसनाधीन होणार नाही व आत्महत्या करणार नाही. महिलांवरील अत्याचार कसे कमी होतील या गोष्टींवर सध्या काम हाती घेतले आहे. तसेच आपला देश हा कृषिप्रधान आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना शेती पूरक व्यवसाय करणे व सेंद्रिय शेती करून जास्तीत जास्त उत्पन्न काढणे या सर्व विषयांवर काम चालू आहे.

धन्यवाद...
तेजस संगिता धनंजय पाटील

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News