भारतीय तरुणांची स्त्रियांसाठी असलेली विकृत मानसिकता कधी बदलेल?

निखिल ठाकरे, हिंगनघाट
Tuesday, 11 February 2020

काल गांधीजींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. एका प्रध्यापिकेला एका विवाहित तरुणाने एक तर्फी  प्रेमातून पेट्रोल टाकून भर रस्त्यात पेटवून दिले. यात पिडीत तरुणी ४०% अत्यंत गंभीररित्या भाजली, या घटनेत पिडीतेचे तोंड आतून बाहेरून भाजले. त्या क्रूर तरुणाचे नाव विकेश नगराळे. तो स्वतः विवाहीत असून त्याला सहा महिन्याची मुलगी आहे, असे असूनसुद्धा तो एवढा क्रूरपणा कसा करू शकतो?

अत्यंत निर्घुणपणे भर रस्त्यात एका तरुण प्रध्यापिकेला पेट्रोल टाकून पेटवून टाकण्याची क्रूरता कुठून आली? यात त्याने त्या तरुणीबरोबर आपल्या पत्नीला लहान मुलीला अनाथ केले. कुटुंबांची वाताहत केली.  समाजात फोफावत चाललेली ही 'छपाक' मानसिकता रोखण्यासाठी देशात शरिया कायदा  करण्याची गरज आहे.

समाजात अशा प्रवृत्तीला रोखण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलण्याची गरज आहे. अजूनही निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी होत नाही. तारीख पे तारीख चालू आहे. आज छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात स्त्री अत्त्याचार रोखण्यासाठी कडक कायदे करण्याची आणि त्यांची तातडीने अमल बजावणी करण्याची गरज आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News