स्त्रियांच्या सामाजिक मानसिकतेच्या बेड्या तुटणार कधी?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 August 2020
  • आजची चर्चा, माझा आधिकार, माझे मत
  • स्त्रियांनी शिक्षण, नोकरी, व्यवसाय, समाजकार्य करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. तरी देखील स्त्रियांकडे दुय्यम नजरेने पाहिले जाते. आधुनिक काळातही स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदललेला नाही.

मुंबई : पुरुषांनी निर्माण केलेली 'चूल आणि मूल' ही मानसिकता झुगांरून स्त्रिया बाहेर पडत आहेत. स्त्रियांनी शिक्षण, नोकरी, व्यवसाय, समाजकार्य करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. तरी देखील स्त्रियांकडे दुय्यम नजरेने पाहिले जाते. आधुनिक काळातही स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदललेला नाही. समाजाने स्त्रियांच्या पायात सामाजिक नियमांच्या बेड्या घातल्या आहेत. स्त्रियांच्या सामाजिक मानसिकतेच्या बेड्या तुटणार कधी? या विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपमध्ये आज मनोसोक्त चर्चा करण्यात आली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

मी लहानपणापासून ऐकत आले 21व्या शतकामध्ये स्त्री पुरुष समानता होणार, स्त्री सक्षम होणार. 2021 साल उजाडलं पण स्रियांन विषयी पुरुषांचे मानसिक  विचार काही बद्दले नाहीत. 1848साली पुण्यात, मुलींची पहिली शाळा  महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी  चालू करून स्रियांना जी दूरदृष्टी दाखवली त्याला खरंच आज तोड नाही. जाचक धार्मिक बंधने आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या जात्यात रोज भरडल्या जाणार्‍या लाखो स्त्रियांसाठी ‘शिक्षण’ एक अपूर्व असा आत्मभानाचा प्रकाश घेऊन आले. शिक्षण घेण्यासाठीचा स्त्रियांचा लढा हा कधीच सोपा नव्हता आणि आजही नाही. निसर्गाने दिलेल्या जबाबदाऱ्या तर तिला पार पाडाव्याच लागतात. त्याच बरोबर तिच्यावर लादल्या गेलेल्या ही जबाबदाऱ्या ती पार पाडतचं आहे. महिलांना शिक्षणामुळे आत्मविश्वास आला. त्या सक्षम झाल्या आहेत, पण त्यांचे सक्षमीकरण पचवू शकणारे पुरुष आपला समाज  तयार करू शकलेलो नाही. राजकीय पौगंडावस्थेमध्ये स्रिया वाहून जाताना दिसत आहेत. तर दुसरीकडे स्त्रियांची सामाजिक सुरक्षितता प्रचंड धोक्यात आलेली आहे. लहान मुलींवर लैंगिक अत्याचार वाढले आहेत.

पुरुषसत्ताक मानसिकतेमूळे प्रेमात नात्यात नकार न पचवू शकणारे पुरुष तसेच एकतर्फी प्रेम करणारे पुरुष ऍसिड खून बलात्कार, चारित्र्यहीन करणारे पुरुष दिवसेंदिवस वाढतच आहेत. पुरुषसत्ताक अवस्थेमध्ये आजही तिला तिच्या लैंगिकतेविषयी अबोल राहावे लागत आहे. आपल्या समाजामध्ये पुरुषांचा  स्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. मुलगा मुलगी अजूनही भेदभाव केला जातो. पुरुष हा स्त्रीला त्याच्या हातातल खेळण, कटपुतली,त्याच्या इशाऱ्यावर बोटावर नाचणारी एक बाहुली समजतो. म्हणून स्रियांकडे बघण्याची मानसिकता हा पुरुष कधी बदलुच शकत नाही. 

समाजातील घरातील पुरुषांची मानसिकता जर स्रियांविषयी बदलायची असेल, तर प्रत्येकाच्या घरामध्ये जन्माला येणारी मुलगा मुलगी समान मानली पाहिजे. दोघांनाही एकसारखे खेळणे दिले पाहिजे. आपल्याकडे मात्र मुलीला भांडी, बाहुली दिली जाते. आणि मुलांना बॅट बॉल दिला जातो. इथेच एवढा मोठा फरक केला जातो. कारण मुलगी ही घरात राहील पाहिजे, आणि मुलगा घराबाहेर पडले हे विचार जर बद्दले तर आणि त्या दोघांनाही  जर लहानपणापासून एकसारखी शिकवण दिली. तर नक्कीच पुरुषाची स्रियांकडे बघण्याची मानसिकता बदलेल. महिला सुशिक्षित सक्षम समृद्ध आजही आहेत. उद्याही असतील आणि इथून पुढेही होतील. पण आपल्या पुरुषी समाजाने हे स्वीकारायला हवे. तिच्यावविषयी आदर बाळगायला हवा. या समाजातील प्रत्येक महिला तसेच रस्त्याने जाणारी प्रत्येक मलगी ही एकटी नसून ती आपली किंवा माझी जबाबदारी आहे. हे स्वीकारले तर नक्कीच स्रियांच्या सामाजिक मानसिकतेच्या बेड्या तुटतील आणि आपला समाज माणुसकीच्या प्रवासातील हे क्रांतिकारी मोठं पाऊल ठरेल...
- शिल्पा नरवडे

सामाजिक परिवर्तनाची गती खूप मंद असते जो पर्यंत पुरुषाची स्त्रियांकडे तुच्छतेणे पाहण्याची मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत स्त्रियांच्या मानसिक बेड्या तुटणार नाहीत. ज्या महिला आर्थिक स्वावलंबी आहेत त्या समाजाचे अन्यायकारक नियम झुगारून स्वतः निर्णय घेताना दिसतात. त्यामुळे महिलांना पुरुषांवर अवलंबून न राहता स्वावलंबी बनवलं पाहिजे. तेव्हा महिला स्वतः सामाजिक बेड्या तोडू शकतील.
- स्वप्नील भालेराव

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News