कोकण रेल्वे कधी सुरु झाली? आणि कोणी सुरु केली...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 25 December 2019

26 जानेवारी 1998 म्हणजेच प्रजासत्ताक दिनी अखेर आठ वर्षांच्या भगीरथ प्रयत्नानंतर कोकण रेल्वेची सर्व किनारपट्टी कव्हर करणारी गाडी धावली.

सुट्टी पडली की असं वाटायचं की गावी कधी जाऊ, मज्जा करू आणि गावचे नाव घेतले की लगेच गावाची आठवण येते. लहानपणी सुट्टीमध्ये किंवा सण असेल की मामाच्या गावी जायचं खूप मस्ती करायची आणि खूप खायचं. आपण सर्वे लहान असताना सुट्टी पडली की आधी हे गाणं म्हणायचो, झुकू झुकू झुकू झुकू अगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहू या मामाच्या गावाला जाऊ या...! पण मामाच्या घरी जायचं असेल तर आधी बाय रोड जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता.

बाय रोड जायचं तर रस्ता कठीण आणि वेळ सुद्धा खूप लागायचा. कोकणातल्या माणसांना त्यावेळी असं वाटयचं सगळीकडे रेल्वे आली पण आपल्या कोकणातच अजून नाही आली, आपल्या कोकणाक कधी यायची ही आगगाडी? 1993 सालापर्यंत मुंबई ते मंगलोर, गोवा व कर्नाटक, कोकण, केरळच्या तसेच दक्षिण भारतातील किनाऱ्यावरच्या गावांसाठी डायरेक्ट रेल्वेची सोय नव्हती. 26 जानेवारी 1998 म्हणजेच प्रजासत्ताक दिनी अखेर आठ वर्षांच्या भगीरथ प्रयत्नानंतर कोकण रेल्वेची सर्व किनारपट्टी कव्हर करणारी गाडी धावली.

तसेच नाथ पै, मधु दंडवते व जॉर्ज फर्नांडीस ह्यांनी कोकण रेल्वेची संकल्पना मांडली. मुंबई आणि मंगलोर यांनी कोकण रेल्वे सुरू व्हायच्या आधी 2 मोठी बंदरं डायरेक्ट रेल्वेने जोडलेली नव्हती. लोकांना जर त्या विभागात जायचे असेल तर पुणे- बेळगाव-बंगळूरु अशा रुटच्या ट्रेनने जावे लागायचे. ह्या दोन शहरांना जोडणारा राष्टूीय महामार्ग क्रमांक 66 जो आधी राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 17 म्हणून ओळखला जात असे, तो 1970 साली बांधला होता. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News