तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावून दिलेल्या नवर्याकडून काडीमोड होत नाही तेव्हा...

रशिद इनामदार
Wednesday, 27 February 2019

स्मिता पाटील आणि डॅा .मोहन आगाशे यांच्यासह निळू फुले, सुलभा देशपांडे, बाळ कर्वे या दिग्गजांच्या भुमिका असलेला डॅा. जब्बार पटेल दिग्दर्शित 'जैत रे जैत' सिनेमा आज पुन्हा पाहीला. तसा तो खुपदा पाहीला असेल (पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो) त्यात कित्येक गोष्टी इतक्या सहजपणे दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न झालाय. लेखक गो. नी. दांडेकरांना त्याचं अधिक श्रेय जायलाच हवं. या सिनेमाविषयी मी आधीही लिहीलं असेलच तरीही आज पुन्हा लिहण्याचा मोह आवरता येत नाही. त्याला कारणंही तितकीच गंभीर आहेत.

स्मिता पाटील आणि डॅा .मोहन आगाशे यांच्यासह निळू फुले, सुलभा देशपांडे, बाळ कर्वे या दिग्गजांच्या भुमिका असलेला डॅा. जब्बार पटेल दिग्दर्शित 'जैत रे जैत' सिनेमा आज पुन्हा पाहीला. तसा तो खुपदा पाहीला असेल (पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो) त्यात कित्येक गोष्टी इतक्या सहजपणे दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न झालाय. लेखक गो. नी. दांडेकरांना त्याचं अधिक श्रेय जायलाच हवं. या सिनेमाविषयी मी आधीही लिहीलं असेलच तरीही आज पुन्हा लिहण्याचा मोह आवरता येत नाही. त्याला कारणंही तितकीच गंभीर आहेत. त्या सिनेमातील चिंदीने (स्मिता पाटील) बंडखोरी करत तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावून दिलेल्या नवर्याकडून काडीमोड घेतल्याचा प्रसंग वारंवार आठवला. त्याचप्रमाणे जगणं असह्य करणार्या जोडीदारापासून फारकत घेण्याची प्रबळ इच्छा का दिसत नाही?? किंवा पसंतीने निवडलेल्या जोडीदाराचे कालातंराने रंगढंग दिसू लागल्यावर देखील परतीचे मार्ग बंद झाल्यामुळे नाईलाज होतो. 

त्रास, छळ सहन करत जगत रहावं लागतं कारण तिला जर कोणी दुसरं आवडू लागलं किंवा विश्वासार्ह वाटू लागलं तरी तिथे तिचा स्विकार होईल याची शक्यता नाही. तिच्या या अन्यायाविरूद्धच्या बंडखोरीला समाज ठाकरवाडीतील ठाकरांप्रमाणे स्विकारण्याच्या मनस्थितीत नाही. त्यात ती एकटी असली तर मला वाटतं बंडखोरी करेलही नातेवाईक, समाजाचे टोमणे त्रास देखील सहन करेल पण जर अपत्ये असतील तर तीला ते करणं अशक्य होऊन बसतं. अशावेळी स्वतःपेक्षा पोटच्या लेकरांच्या सुखाचा भवितव्याचा विचार ती करते. तिच्या या विचाराचा गैरफायदा घेणं मात्र तिचा जोडीदार सुरूच ठेवतो. त्याला एक ना एक दिवस देव सुबुद्धी देईल या आशेवर जगावं लागतं.. पण तो सुखाचा क्षण पाहायला ती जीवंत तरी हवी ना....? हे असं कित्येक घरांमध्ये सुरू असल्याचं त्या अभागी महीलांच्या तोंडून मी ऐकलंय... त्या मन मोकळं करतात पण स्वतः बंडखोरी करत नाहीत किंवा मला ही काही करण्यापासून शपथ घालून रोखतात... मी ही त्यांच्या या द्विधा मनःस्थितीला अप्रत्यक्ष समर्थन देऊन... त्यांच्या छळात पापी ठरतो... अपराधीपणाची सल मनाला टोचत राहते...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News