कधी वाटे मजला तू...

प्रांजली बांगले
Saturday, 27 July 2019

कधी वाटे मजला तू
माझ्यासाठी व्हावे पक्षी
आकाशातील तारे तोडून
माझ्या दारी काढावी नक्षी

कधी वाटे मजला तू
माझ्यासाठी व्हावे पक्षी
आकाशातील तारे तोडून
माझ्या दारी काढावी नक्षी

कधी वाटे मजला तू
माझ्यासाठी व्हावे नदी
धरणीवरच्या तहानलेल्यांची
दूर व्हावे व्यादी

कधी वाटे मजला तू
माझ्यासाठी व्हावे वारे
रंग-बिरंगी फुलांचे गंध
सगळीकडे पसरवावे

कधी वाटे मजला तू
माझ्यासाठी व्हावे वेडा
शेजारील पारिजातकाचा
माझ्या अंगणी पाडावा सडा

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News