यंत्र अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. अभियांत्रिकीची ही सर्वांत जुनी व विस्तृत अशी शाखा आहे. अठराव्या शतकात सुरू झालेल्या युरोपातील औद्योगिक क्रांतीनंतर खऱ्या अर्थाने या शाखेला
उभारी मिळाली.
वैज्ञानिक, आर्थिक, सामाजिक व प्रत्यक्षातील ज्ञान मिळविण्याच्या व वापरण्याच्या कौशल्यांना, व्यवसायांना आणि शास्त्रांना त्याचा प्रत्यक्षात जीवनातील वापरास ‘अभियांत्रिकी’ असे म्हणतात. आपण सामान्यपणे विज्ञानाच्या प्रत्यक्षातल्या उपयोगाला अभियांत्रिकी असे म्हणतो. त्यात बांधकाम यंत्रे, उपकरणे, पदार्थ, प्रणाली व प्रक्रिया यांचे आराखडे व निर्मिती करणे ही अभियांत्रिकीची प्रमुख कार्ये आहेत.
यंत्र अभियांत्रिकीत यंत्रांची निर्मिती करणे, त्यांचे संचलन करणे व त्याद्वारे उत्पादन निर्माण करणे किंवा त्यावर प्रक्रिया करणे या गोष्टींचा समावेश होतो. त्यासाठी विज्ञानातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व सांख्यिकी आदी शाखांतील मूलभूत तत्त्वांवर आधारित संकल्पनांची योग्य सांगड घातली जाते. एखाद्या संकल्पनेतून समाजोपयोगी उत्पादन किंवा प्रक्रिया निर्मिती करणे व बाजारात त्यांचे वितरण करणे, हे मेकॅनिकल इंजिनिअरचे प्रमुख कार्य असते.
आजच्या काळात जवळपास सर्वच क्षेत्रांत मेकॅनिकल इंजिनिअरची गरज असते. जसे, की कार, मोटारसायकल, ट्रक, बस आदी वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्या, विमान व जहाजबांधणी करणाऱ्या कंपन्या, विमानबांधणी करणाऱ्या कंपन्या, वेगवेगळे खाद्य उत्पादने व प्रक्रिया उद्योग, संगणक व विद्युत उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, वीजनिर्मिती आणि वितरण करणाऱ्या कंपन्या, रासायनिक उत्पादन क्षेत्रातील कंपन्या, बांधकाम क्षेत्रातील कंपन्या, खनिज तेल शुद्धीकरण कारखाने आदी कंपन्यांत मेकॅनिकल इंजिनिअरची आवश्यकता असते. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये यंत्र व यंत्रप्रणाली चालविण्यासाठी औष्णिक व यांत्रिक ऊर्जेचा वापर करण्याच्या दृष्टीने रचना करणे व त्याचे विश्लेषण करणे या गोष्टींचा समावेश होतो. या क्षेत्रातील अभियंते सर्व प्रकारच्या यंत्राची रचना, चाचणी, निर्मिती व ती कार्यरत करण्याचे काम करतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्राची दोन प्रकारांत विभागणी होते. त्यात पहिले म्हणजे यंत्र, यंत्रांची रचना, साहित्य, जलशक्ती व हवेची शक्ती. दुसऱ्या प्रकारात कार्य व ऊर्जा, उष्णता, वायुविजन व वातानुकूलन. यातूनच मेकॅनिकलमधील विविध उपशाखांचा उगम होतो. जसे, की ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग, प्रॉडक्शन इंजिनिअरिंग, मरीन इंजिनिअरिंग, एरोनॉटिक्स व एरोस्पेस इंजिनिअरिंग, इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग आदींचा समावेश होतो.
2. नीट-२०२०चा प्रत्यक्ष अर्ज भरताना
नीट-२०२० परीक्षेचे ऑनलाइन अर्ज www.ntaneet.ac.in संकेतस्थळावरून भरण्यापूर्वी प्रथम माहितीपत्रक डाउनलोड करून त्याचा अभ्यास करावा. कमीत कमी फॉर्मचा नमुना (repelica) पान क्रमांक ११६ ते १३० पाहून त्यानुसार आवश्यक माहिती संकलित करून मगच फॉर्म भरण्यास सुरुवात करावी. ऑनलाइन अर्ज भरणे, इमेजेस अपलोड करणे, पेमेंट व कन्फर्मेशन पेज प्रिंट घेणे, हे महत्त्वाचे चार टप्पे आहेत.
ऑनलाइन अर्ज भरणे
न्यू रजिस्ट्रेशन येथून सुरुवात करावी. विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, दहावी, बारावी पासिंग सर्टिफिकेटनुसार नोंदवावे. स्वतःच्या नावाबरोबरच आईचे, वडिलांचे नाव नोंदविताना स्पेलिंग चुकणार नाही याची दक्षता घ्या.
कॅटेगरी नोंदविताना एससी, एसटी, ओबीसी- एनसीएल, ईडब्ल्यूएस व यूआर- अनरिझर्व्हड म्हणजेच जनरल या पर्यायातून अचूक नोंदणी करावी. एससी एसटीसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा नाही. सध्या अर्ज भरताना कोणताही दाखला अपलोड करावा लागत नसून भविष्यात एनसीएल मिळणार असेल तसेच ओबीसी सेंट्रल यादीमध्ये आपला समावेश असेल तरच ओबीसीएनसीएलमधून नोंदणी करावी. ईडब्ल्यूएससाठी वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी, शेतजमीन पाच एकरांहून कमी, रहिवासी फ्लॅट एक हजार चौरसफुटांपर्यंत, नगरपालिका हद्दीत शंभर चौरस यार्ड व हद्दीबाहेर दोनशे चौरस फुटांपेक्षा अधिक प्लॉट नसावा.
ड्रॉपडाऊन मेन्यूमधून योग्य पर्याय निवडून फॉर्म भरावा. जन्मदिनांक, राज्य, जिल्हा, अचूक निवडावा. इमेल व मोबाईल स्वतःचा नोंदवावा. खासगी क्लासेसचे इमेल नोंदवू नयेत. आयडेंटीफिकेशनसाठी आधार हा सर्वांत चांगला पर्याय असून शेवटचे चार अंक नोंदवावे लागतात. आई वडिलांचे शिक्षण, व्यवसाय, वार्षिक उत्पन्न व्यवस्थित नोंदवावे.
रिसीट, प्रिव्ह्यू, नेक्स्ट या पर्यायांचा वापर करावा. आपण भरलेला फॉर्म दिसतो, तो तपासूनच पुढे पुढे जावे. आपला पासवर्ड स्वतः तयार ठेवावा. कमीत कमी एक कॅपिटल, एक स्मॉल अक्षर, एक अंक व स्पेशल की याचा वापर करून आपला पासवर्ड आठ ते तेरा अक्षरांमध्ये मजबूत असावा. सायबर कॅफेमधून स्वतःचे नाव ॲट १२३ असा पासवर्ड टाकतात ते चुकीचे आहे. स्वतः बनविलेला पासवर्ड, सुरक्षा प्रश्न व त्याचे निवडलेले उत्तर लिहून ठेवावे. आपणास ओटीपी येतो व तो नोंदवून अर्ज सबमिट केल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर प्राप्त होतो.
प्रश्नपत्रिका भाषा इंग्रजी निवडावी. आपल्या पसंतीनुसार अठरा परीक्षा केंद्रांपैकी प्राधान्याने चार सेंटर नोंदविणे बंधनकारक आहे. इयत्ता दहावी, अकरावी व बारावी शैक्षणिक माहिती, शाळेचे नाव पत्ता व गुण अचूक नोंदवावेत. प्रथमच बारावी परीक्षा २०२०मध्ये देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पात्रता परीक्षा कोड एक निवडावा. या पूर्वी बारावी पास झालेले म्हणजेच रिपीटर विद्यार्थ्यांनी कोड दोन नोंदवावा.
कायमचा पत्ता, पत्रव्यवहाराचा पत्ता पिनकोडसह अचूक नोंदवावा. फॉर्म भरण्याच्या चारही स्टेप्स एकाच वेळी पूर्ण कराव्यात असे बंधनकारक नसून प्रत्येक वेळी आतापर्यंत भरलेला फॉर्म दिसतो, तो तपासावा. बँक सेव्ह ॲज अ ड्राफ्ट, प्रिव्ह्यू व सबमिट या बटणांचा वापर करून फॉर्म भरावा. सायबर कॅफेमध्ये त्यांच्यातर्फे अत्यंत वेगाने ओके ओके करत फॉर्म भरला जातो, त्याने चुका होतात. संपूर्ण प्रक्रियेत पहिला टप्पा महत्त्वाचा असून तो संपल्यानंतर तेवढ्याच भागाची एक प्रिंट घ्यावी. ती काळजीपूर्वक तपासावी व मगच दुसऱ्या इमेजेस अपलोडींग टप्प्याकडे जावे.
अत्यंत महत्त्वाचे : नीट परीक्षेसाठी स्पेशल ड्रेसकोड आहे. अर्ज भरताना ‘क्या आप नीट परीक्षा मे निर्धारित ड्रेस कोड के स्थानपर पारंपरिक पोशाख पहनकर आना चाहते है?’ असा प्रश्न आहे. ज्यांना ड्रेस कोड पाळावयाचा आहे त्यांनी NO हा पर्याय निवडावा. NO हा पर्याय निवडल्यानंतर मी ड्रेस कोड पाळणार आहे, पारंपरिक वेशभूषा मला नको आहे, अपवादात्मक म्हणजे बुरखा, शीख पगडी वगैरे बाबतीत YES नोंदवू शकता. फक्त एकच मुलगी असेल तर सिंगल गर्ल म्हणून नोंदणी करावी. मुलीला भाऊ चालणार नाही, परंतु ट्विन्स, जुळी एक मुलगी, एक मुलगा किंवा दोन्हीही मुले असतील तरीही त्यांनी सिंगल गर्ल म्हणून नोंदणी करावी.
3.एमजीआयएमएस’मधील ‘एमबीबीएस’ प्रवेश
आ रोग्यविज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या आधिपत्याखालील एमजीआयएमएस- महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम वर्धा हे देशातील ग्रामीण भागात १९६९ मध्ये स्थापन झालेले पहिले वैद्यकीय महाविद्यालय आहे. सुरुवातीला १९४४मध्ये कस्तुरबा रुग्णालयाची स्थापना झाली होती.
संस्थेची वैशिष्ट्ये
महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था सेवाग्राम (वर्धा) हे देशातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अनेक वर्षांपासून पहिल्या २५ क्रमांकात असून, या संस्थेमध्ये ‘एमबीबीएस’ पदवी अभ्यासक्रमाबरोबरच २० विविध शाखांतून पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सोय आहे. १००० बेडचे प्रशस्त रुग्णालय असून, अद्ययावत यंत्रसामग्री आहे. दरवर्षी बाह्यरुग्ण कक्षात ६ लाख, तर आंतररुग्ण कक्षात ५० हजार रुग्ण उपचार घेतात. गांधीजींच्या तत्त्वाचे पालन करणारी ही संस्था असून, सर्व विद्यार्थी व कर्मचारी खादीचे कपडे परिधान करतात. कर्मचारी व विद्यार्थी श्रमदानात सहभागी होतात
शैक्षणिक पात्रता
प्रवेशासाठी बारावी अथवा तत्सम परीक्षेत पीसीबी विषयात एकत्रितरीत्या खुल्या गटासाठी किमान ५० टक्के व राखीव गटासाठी ४० टक्के गुणांची आवश्यकता आहे. नीट परीक्षेतून खुल्या गटातून पात्रतेसाठी किमान ७२० पैकी ५० पर्सेंटाइल व राखीव गटातून ४० पर्सेंटाइलची आवश्यकता लागते.
उपलब्ध जागा...
संस्थेत ‘एमबीबीएस’ शाखेच्या एकूण १०० जागा उपलब्ध आहेत. त्या पैकी ५० टक्के जागा या फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठीच राखीव जागा आहे. उर्वरित ५० टक्के जागा राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी देश पातळीवर उपलब्ध होतात. महाराष्ट्र ५० टक्के कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार आरक्षण उपलब्ध होते. देश पातळीवरील कोट्यातून प्रवेश घेणाऱ्यांना राष्ट्रीय स्तरावरील नियमानुसार आरक्षण लागू होते.
प्रवेश प्रक्रिया....
प्रवेशासाठी २०१५ पर्यंत संस्थेतर्फे स्वतंत्र प्रवेश परीक्षा देश पातळीवर घेण्यात येत होती. देश पातळीवरील प्रवेशासाठी नीट परीक्षा लागू झाल्यानंतर आता सर्व प्रवेश नीट परीक्षेतून प्राप्त होणाऱ्या ऑल इंडिया रँकनुसार दिले जातात. नीट परीक्षा घेण्याची व परीक्षेतील गुणांद्वारे ऑल इंडिया रँक देण्याची जबाबदारी एनटीए बोर्डाकडे असते. नीट परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो.
महाराष्ट्र कोटा ५० टक्के जागा....
राज्यातील शासकीय व खासगी ‘एमबीबीएस’ व ‘बीडीएस’सह आरोग्य विज्ञान शाखेतील उर्वरित शाखांची प्रवेश प्रक्रिया राज्य शासनाचाय सीईटी सेल- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे www.mahacet.org संकेतस्थळावरून पसंतीक्रम भरून राबविली जाते. याच प्रवेश प्रक्रियेमध्ये ‘एमजीआयएमएस’मधील राज्याच्या कोट्यातील जागांवरील प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविण्याची सोय असते. राज्याच्या कोट्यातील सर्व ५० टक्के जागांचे वाटप हे ३० टक्के राज्यस्तरीय कोट्यातून होते. उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या मधून ७० टक्के कोट्यातून वाटप होत नाही. वार्षिक शैक्षणिक शुल्क हे राज्यातील इतर शासकीय महाविद्यालयांप्रमाणे असते.
देशभरातील ५० टक्के कोटा
देशभरातील ‘एमबीबीएस’ व ‘बीडीएस’ शाखेच्या शासकीय महाविद्यालयातील १५ टक्के जागेवरील तसेच देशभरातील अभिमत व केंद्रीय विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया एमसीसी- मेडिकल कौन्सिलिंग कमिटीतर्फे www.mcc.nic.in संकेतस्थळावरून पसंतीक्रम भरून राबविली जाते. याच प्रवेश प्रक्रियेत वर्ध्यामधील इतर राज्यांच्या कोट्यातील जागांवरील प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदवून प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाते. संस्थेबद्दलच्या अधिक माहितीसाठी www.mgims.ac .in संकेतस्थळावरून माहिती घ्यावी.
4.सगळं संपलंय असं वाटत असताना अखेरचा एक प्रयत्न कराच!
नाशिक येथील रियाज अहमद सय्यद यांनी पुणे विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे, बारावीत एका विषयात नापास झालेले रियाज यांनी पाचव्या प्रयत्नात यशाचे शिखर गाठले आहे. अतिशय सामान्य कुटुंबातून आलेले रियाज यांचे वडील दहावी, तर आई सातवीपर्यंत शिकलेली आहे. समृद्ध शिक्षणाचा कुठलाही वारसा नसताना वडिलांनी मुलांना उच्च शिक्षण देण्याचा ध्यास घेतला. रियाज यांनी सर्वोच्च पदावर विराजमान होऊन सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले आहे.
प्रश्न : प्रशासकीय क्षेत्रात येण्याचा निर्णय शिक्षणाच्या कोणत्या टप्प्यावर घेतला?
- मी पुणे येथून विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. महाविद्यालयात विद्यार्थी संसद सचिव होतो. त्यामुळे राजकारणात नशीब अजमावावं अस वाटायचं; पण वडिलांनी एक दिवस मला समजावून सांगितलं, की तुला समाजसेवा करायची आहे, तर शिक्षणाच्या वाटेवर तुला कुठे अशी संधी उपलब्ध असेल तर ती कर. राजकारणात जाण्याची आपली परिस्थिती नाही. मग माझ्यासमोर
‘यूपीएससी’ हा एकमेव पर्याय होता. मी २०१४ मध्ये स्पर्धा परीक्षेकडे वळलो.
अभ्यास केला तितका मनापासून केला. मी परीक्षा देत असताना निगेटिव्ह मार्क जास्त व्हायचे, मी तीन रणनीती आखल्या होत्या. त्यात पहिली मला जे शंभर टक्के माहीत आहे ते आधी सोडविणे, दुसरी जे पन्नास टक्के माहिती आहे ते अखेरीस सोडविणे व तिसरी जे येतच नाही असे अभ्यास केला तितका मनापासून केला. मी परीक्षा देत असताना निगेटिव्ह मार्क जास्त व्हायचे, मी तीन रणनीती आखल्या होत्या. त्यात पहिली मला जे शंभर टक्के माहीत आहे ते आधी सोडविणे, दुसरी जे पन्नास टक्के माहिती आहे ते अखेरीस सोडविणे व तिसरी जे येतच नाही असे. अनुभव कसा होता.
- सध्या मसुरी येथे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणाचा अनुभव खूपच आनंददायी आहे. आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्या होत्या त्या प्रशिक्षण काळात पूर्ण होत आहेत. नवीन खूप काही शिकायला मिळत असल्याचा आनंद आहे. #वडील नेहमी म्हणायचे, ‘बेटा कामियाब होने के लिए अपनी कोशिशों में कोई कमी नहीं रखना, वरना वक्त बडी बेरहमी से तुम्हारी एक-एक गलती का बदला ले सकता है। तब तुम्हारे सारे सपने धरे के धरे रह जाएंगे।’