पाकिस्तानात गव्हाच्या पिठाची टंचाई चपात्या मिळेना; लोकांसमोर भूक भागवण्याचं आव्हान

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 4 February 2020
  • पाकिस्तानात गव्हाच्या पिठाची टंचाई
  • चपात्या आणि नान मिळेना
  • लोकांसमोर भूक भागवण्याचं आव्हान

महगाईवर नियंत्रण ठेवण्यात पाकिस्तान पुरता अपयशी ठरलाय. पाकिस्तानात आजवर कधीही झालेला नाही असा एक विचित्र पेचप्रसंग निर्माण झालाय. जगात गव्हाचं उत्पादन घेण्यात आघाडीवर असलेल्या या देशातच गव्हाच्या पीठाचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे लोकांना चपाती आणि नान मिळणं अवघड बनलय.

आधी टोमॅटो महागले, मग अन्नधान्य, नंतर पेट्रोल डिझेल आणि आता गव्हाचं पीठ...इम्रान खान यांचा नया पाकिस्तान सध्या बारीक बारीक गोष्टींसाठी झुजतांना दिसतोय.. सध्या इथल्या बाजारातून गव्हाचं पीठ हा दररोजच्या जेवणातील महत्वाचा घटक गायब झाल्यानं पाकिस्तानी जनतेच्या तोंडचं पाणी पळालंय. बलुचिस्तान, सिंध, पंजाब आणि खैबर पख्तुन्वा या सर्व चार प्रांतांमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे.
पाकिस्तानातील लोक पोळी आणि नानसाठी अक्षरशः तळमळतायेत.

गव्हाचा प्रश्न सुटत नसल्यानं रोजच्या जेवणात   तांदळाचा वापर वाढवावा यासाठी इथल्या स्थानिक सरकारांकडून जनतेवर दबाव टाकला जातोय..नानसाठी पीठ नसल्यानं नान बनवणाऱ्या विक्रेत्यांचं नुकसान होतंय. नान विक्रेत्याससंघतनानी स्थानिक सरकारांविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतलाय.

गव्हाच्या समस्येला इम्रान सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी नेते बिलावल भुट्टो यांनी केलाय. पाकिस्ताननं 40 हजार टन गव्हाचं पीठ अफगाणिस्तानला निर्यात केल्यानं ही समस्या उदभवल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. तर इम्रान खान यांनी याचं खापर साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फोडलंय. पण कारवाईच्या अश्वासनाखेरीज कृती दिसून येत नाही. आता मार्च आणि एप्रिल मध्ये सिंध आणि पंजाब प्रांतातून गव्हाचं जे उत्पादन येईल त्यावरच पुढील सारी भिस्त असेल. तोवर खवय्यांना नान आणि चपातीची भूक भातावर आणि इतर पदार्थांवर भागवावी लागेल..

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News