व्हॉट्सअँपच नव फिचर; फाईलनुसार जागा सांगणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 August 2020

व्हॉट्सअँप युजर्सना यापुढे प्रत्येक फाईलला लागणारी जागा सांगणार आहे. नवीन फिचरमुळे मेमरीचा योग्य वापर केला जाईल.

मुंबई : युजर्सची गरज लक्षात घेऊन व्हॉट्सअँपने आपल्या फिचरमध्ये अनेक बदल केले आहेत. सध्या व्हॉट्सअँपने एक नवीन फिचर विकसीत करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे मोबाईलची मेमरी आता कमी प्रमाणात लागणार आहे. युजर्सना कोणत्या फाईलसाठी किती मेमरी लागेल याची माहिती मिळणार आहे. 

व्हॉट्सअँप युजर्सना यापुढे प्रत्येक फाईलला लागणारी जागा सांगणार आहे. नवीन फिचरमुळे मेमरीचा योग्य वापर केला जाईल. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सॲपने आपल्या स्टोरेजमध्ये काम करण्यास सुरुवात केली, स्टोरेज सेक्शनमध्ये किती मेमरी वापरली जाईल याची माहिती युजरला दिली जाणार आहे त्यामुळे फोटो, व्हिडिओ, पीडीएफ अशा विविध फाईलला मेमरी किती खर्च होणार त्याची माहिती मिळणार आहे, त्याचबरोबर कोणत्या कन्टेटला किती मेमरी लागेल यापुढे कळणार आहे.  नवीन फिचरचा  ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे, सध्या हे फिचर प्राथमिक अवस्थेत आहे, डेव्हलप झाल्यानंतर नवीन फिचरची टेस्ट घेतली जाईन त्यानंतर युजर्ससाठी उपलब्ध होईल.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News